अहमदनगर - भारत सरकार युवा व्यवहार क्रीडा मंत्रालय अंतर्गत युवा संघटना द्वारे औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आल्या राष्ट्रीय खुल्या कराटे स्पर्धेत कोपरगाव येथे शिक्षण घेत असलेल्या के जे सोमय्या विद्यालय विद्यार्थिनी प्रगती चोखर हिने दोन रौप्य पदके जिंकली.
दिनांक 12 डिसेंबर रोजी औरंगाबाद येथे राष्ट्रीय खुल्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत भारतामधून हैदराबाद, पंजाब, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मुंबई, पुण्यासह अन्य राज्यातून स्पर्धक सहभागी झाले होते.
या स्पर्धेत 21 व 22 वयोगटात राहता येथील पत्रकार दिलीप चोखर यांची कन्या प्रगती चोखर हिने सहभाग घेऊन अथांग व फाईट या दोन्ही प्रकारात दोन रौप्य पदकांची कमाई करून घवघवीत यश संपादन केले.
प्रगती चोखर हिला व्ही स्टार मार्शल आर्ट कराटे अकॅडमी चे प्रशिक्षक विजय मोगले, अनिल मोगले, मयुर साबळे, भावना निमसे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले असून प्रगती चोखर ही कराटे लाठी चालवणे, तलवारबाजी करणे अन्य खेळांमध्ये तरबेज असून राज्यस्थरीय जिल्हास्तरीय, तालुका स्थरीय गाव पातळी वर अनेक स्पर्धा जिंकून राहाता शहराचे नाव लौकिक केले आहे.
प्रगती चोखर हि के जे सोमय्या वरिष्ठ विद्यालय कोपरगावची विद्यार्थिनी आहे.
तर कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय राहाता येथील विद्यालयातील माजी विद्यार्थिनी आहे, तसेच राहाता येथील दैनिक लोकमतचे पत्रकार व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघा राहाता प्रेस क्लबचे उपाध्यक्ष दिलीप चोखर यांची कन्या आहे.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ राहाता प्रेस क्लब यांच्यासह माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रगती चोखर हिने राष्ट्रीय कराटे स्पर्धेत तालुक्याचे नाव पूर्ण महाराष्ट्रभर गाजवले अशी प्रतिक्रिया दिली.
याप्रसंगी प्रगती चोखर हिचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे तसेच माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील प्रगतीचा सत्कार केला आहे.
0 Comments