औरंगाबाद - आम आदमी पार्टी जिल्हाध्यक्ष तथा निवडणूक कार्याध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक २०/१२/२०२१ रोजी शहरातील रिक्षा चालक बांधवांशी संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
रिक्षा थांब्यावर भेट देण्यासाठी सुरुवात सिडको येथील हिंदुराष्ट्र चौक एन ७/ एन ८ मेन रोड औरंगाबाद येथे दुपारनंतर ४:०० वाजता सुरुवात झाली.
अत्यंत सकारात्मक प्रतिसाद मिळाला. या प्रसंगी अरुण कुलकर्णी यांनी आम आदमी पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व स्वीकारले आणि पुढील संवाद कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला.
प्रारंभी इतर पक्षाच्या बाजूने बोलणारे कुलकर्णी संवादाने प्रभावित होऊन पक्षात सामील झाले.
या प्रसंगी विभागीय सदस्य सदाशिव पाटील, सुनील भालेराव, नासेर खतीब, पाशा खान, रवींद्र पाटील, सुदर्शन बारवाल, अंकुश आगे, ऋग्वेद राईकवार, माजाज खान आणि कैलास बनसोडे इत्यादी कार्यकर्ते प्रचंड उत्साहाने सामील झाले होते.
सर्व रिक्षाचालक बांधवांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिल्याने उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
औरंगाबाद प्रतिनिधी - विशाल पठारे
0 Comments