खबरे हर पल सच का सामना हम करते है लोकतंत्र से सच्ची पत्रकारिता से

W3Schools

देगलूर महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा प्रलंबित मागण्यासाठी बेमुदत संप

नांदेड - देगलुर महाविघालय येथील शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी आपल्या न्याय व प्रलंबित मागण्या संदर्भात संपाचे निवेदन प्राचार्य डॉ अनिल चिद्रावार सरांना आज दिनांक १०/१२/२०२१ ला  दिले.
सदरच्या निवेदनात सुधारित आश्वासित प्रगती योजना लागू करणे व अन्यायकारक शासन निर्णय दिनांक 7/12/ 2018 व शासन निर्णय 16/ 2/ 2019 रद्द करणे.

सातव्या वेतन आयोगात तीन लाभाची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करणे.

महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांना पाच दिवसाचा आठवडा लागू करणे.

महाविद्यालयातील रिक्त असलेले शिक्षकेत्तर पदे तात्काळ भरण्यात साठी मान्यता देणे.

1 नोव्हेंबर 2005 नंतर नियुक्त झालेल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे.
या प्रमुख मागण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी हे दिनांक १४/१२/२०२१ ते १९/१२/२०२१ पर्यंत काळया फिती लावून काम करतील व २०/१२/२०२१ पासून बेमुदत संपात सहभागी होतील हा बेमुदत संप संस्थाचालक अथवा प्राचार्य आदींच्या विरोधात नसून शासनाच्या आडमुठे धोरणा विरोधात आहे.
सदरचे निवेदन देतांना महाविद्यालयाचे अधीक्षक गोविंद जोशी, हनमंत मुखेडकर, भिम कर्णे, दत्तु अण्णा साखरे, बालाराज खेणेवार, राजुदादा जंगीलवार, नाईक श्रीनिवास, तिरुपती उरलागोंडावार, 

पांचाळ किशन, शेख यासिन, रवि बिडवई, हेमनर जी, शंकर चिद्रावार, संगमकर दिपक, गोविंदवार शंकर, सौ ईळेगांवकर सह संघटनेचे सर्व पदाधिकरी, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

पत्रकारिता के लिए सहायता करें

Follow on Dailyhunt

W3Schools

Contact Form

Name

Email *

Message *

W3Schools