खबरे हर पल सच का सामना हम करते है लोकतंत्र से सच्ची पत्रकारिता से

W3Schools

वाचन संस्कृती जागरण पंधरवड्यातील चौथ्या दिवशी काळ निंबाळा येथे ग्रंथदिंडी, पुस्तक वाटप, बक्षिस वितरण व तज्ञांचे मार्गदर्शन उत्साहात संपन्न

उस्मानाबाद - वाचन संस्कृती जागरण पंधरवड्यातील चौथ्या दिवशी काळ निंबाळा येथे ग्रंथदिंडी, पुस्तक वाटप, बक्षिस वितरण व तज्ञांचे मार्गदर्शन उत्साहात संपन्न
काळ निंबाळा ता उमरगा - प्रा शामराव रघुनाथ चव्हाण स्मृती वाचनालयाच्या वतीने दि १५ ते ३१ जानेवारी दरम्यान वाचन संस्कृती जागरण पंधरवडा साजरा केला जात आहे. त्या अंतर्गत आज दि २१ (शुक्रवार) रोजी काळ निंबाळा येथे गावभर ग्रंथदिंडी वाजत-गाजत फिरवण्यात आली. 
ग्रंथदिंडीच्या माध्यमातून वाचन संस्कृती रुजवण्यासाठी जागृती निर्माण करण्यात आली. गावातील काही नागरीकांनी ग्रंथदिंडीला पुस्तके भेट दिली. 
ग्रंथदिंडीला विश्राम दिल्यानंतर जि प प्रशाला मुख्याध्यापक विजयकुमार गोबारे, महादेव सरवदे यांनी उपस्थित विद्यार्थी व नागरीकांना 'वाचनाचे महत्व' या विषयावर मार्गदर्शन केले. 
त्याचबरोबर यापूर्वी वाचनालयामार्फत घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेतील सहभागी एकूण १२ विद्यार्थ्यांना सहभागी प्रमाणपत्र व प्रत्येकी रु.१०१/- चे रोख बक्षीस उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. 
याप्रसंगी सचिन सरवदे, रोडगे, सहदेव सरवदे, सोमनाथ सगर, ॲड शीतल चव्हाण. 

फाउंडेशनचे अध्यक्ष सत्यनारायण जाधव, रितेश सुर्यवंशी उपस्थित होते. 
पंधरवड्यातील पुढील कार्यक्रम कदमापूर, कोळसूर, बेट जवळगा, सालेगाव, आनंदनगर आणि मुरुम याठिकाणी होणार आहेत.

Post a Comment

0 Comments

पत्रकारिता के लिए सहायता करें

Follow on Dailyhunt

W3Schools

Contact Form

Name

Email *

Message *

W3Schools