खबरे हर पल सच का सामना हम करते है लोकतंत्र से सच्ची पत्रकारिता से

W3Schools

राष्ट्रवादीच्या माजी नगराध्यक्ष वर गुन्हा दाखल करा पत्रकार महासंघ श्रीरामपूर

अहमदनगर - श्रीरामपूर 26 जानेवारीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाच्या माध्यमातून सर्व देशवासियांना विचार स्वतंत्र आणि लेखनात स्वतंत्र यांची संधी मिळेल मात्र संविधानामुळे जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली.
अशा श्रीरामपूर पालिकेच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मा नगराध्यक्षा अनुराधा गोविंदा अदिक पालिकेत येताच शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमास पाठ फिरवल्याचे लक्षात आल्याने माझे लोकनियुक्त नगराध्यक्षा पालिकेच्या शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम मात्र विसर पडल्या संदर्भात बातमी लावण्याच्या राग अनावर झाल्याने एका वृत्तवाहिनीच्या संंपादक असलेल्या स्वर्गीय माजी खासदार गोविंदराव आदिक यांची कन्येने तुम्ही पत्रकार आमच्या विरोधात पैसे घेऊन खोट्या बातम्या लावतात ? 
आम्हाला इतर काम नाही का पालिकेच्या ध्वजारोहणास जायला आम्ही काय रिकामटेकडे आहेत का ? अशा शब्दाचा वापर करून दीडशे ते दोनशे लोकांच्या जमावासमोर आरेरावीची भाषा करत एस न्यूज मराठी कानोसा चौफेर या प्रसार माध्यमाध्ये संपादकीय संपादक पदावर काम करत असलेल्या पत्रकार समोर सर्व पत्रकारांचा अपमान केल्याचा निंदनीय प्रकार घडला.
या घटनेचा निषेध नोंदविण्यात ग्रामीण पत्रकार महासंघाच्या वतीने अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय प्रांतअधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील यांना निवेदन देऊन 

भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकाराचा अपमान करत पत्रकारांशी अरेरावी करणाऱ्या या राष्ट्रवादीच्या माजी नगराध्यक्ष अनुराधा अदिक यांच्यावर कायदेशीर रीतने कारवाई करण्यात यावी असी मागणी केली .
नगराध्यक्षा अनुराधा अधिक यांच्यावर गुन्हा दाखल न केल्यास संघटनेच्या वतीने विविध स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा ग्रामीण पत्रकार संघाचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र उंडे यांनी दिला.

त्यामुळे निर्माण होणारी संभाव्य परिणाम व परिस्थितीस राष्ट्रवादीच्या माजी नगराध्यक्ष अनुराधा अदिक हे सर्वस्वी संयुक्तिक जबाबदारव राहतील असे जाहीर केले

या आंदोलनात यावेळी संघटनेचे राज्य संपर्क प्रमुख किरण शिंदे, साई किरण टाइम्सचे राजेश बोरुडे, तिरंगा न्यूजचे असलम बिनसाद, एस न्यूजचे युनुस इनामदार, स्वप्निल सोनार, लोकमतचे भरत थोरात, व्हिजन प्लसचे सायरा सय्यद, एस न्यूज च्या मनीषा थोरात, अविनाश लिहिणार, पत्रकार विठ्ठल गोरणे, जालिंदर अल्हाट आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

पत्रकारिता के लिए सहायता करें

Follow on Dailyhunt

W3Schools

Contact Form

Name

Email *

Message *

W3Schools