डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनाच्या रोजी शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुख्य प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सामूहिक बुद्ध वंदना घेत नामांतर लढ्यात शहीद झालेल्या सर्व भिम सैनिकांना आदरांजली वाहण्यात आली.
त्यानंतर सर्व कार्यकर्ते यांनी उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालयाला भेट देऊन फुलंब्री येथील राजू बिरसोने आणि त्यांच्या परिवारातील लोकांवर खाडी पिंपळगाव येथील गावगुंडांकडून अमान्य वागणूक मिळत असून त्यांच्या परिवाराला न्याय देण्यात यावा अशा विषयाचे मागणी निवेदन सादर करण्यात आले.
आरोपींविरुद्ध पोलिस अधिकारी कारवाई करत नाही उलट गरीब राजू बिरसोने आणि परिवार यांना मारहाण करत आहे असे उपोषण करणारे राजू बिरसोने यांनी फकिराजी बिरसोने यांना सांगितले.
सदर प्रकरण गंभीर स्वरूपात आहे तरी जिल्हाधिकारी यांनी लवकरात लवकर बिरसोने यांना न्याय द्यावा अन्यथा या प्रकरणात असलेले आरोपींविरुद्ध लवकर भिम आर्मी आणि अखिल भारतीय गुरू रविदास परिवर्तन सेना पूर्ण महाराष्ट्रभर उपोषण आणि आंदोलन करणार आहे याची शासनात नोंद करावी अशी माहिती आमचे भोकरदन प्रतिनिधी साबेर शेख यांनी न्यूज ब्यूरो यांना दिली.
यावेळी भिम आर्मी भोकरदन विधानसभा अध्यक्ष अनिलभाऊ पगारे, संघटक कृष्णाभाई वेलदोडे, शहराध्यक्ष पंडित बिरसोने, शब्बीर मन्सूरी, योगेश आरके, कन्हैयालाल बिरसोने, मुकेश आरके, बबन बिरसोने, शिवलाल जोहरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments