खबरे हर पल सच का सामना हम करते है लोकतंत्र से सच्ची पत्रकारिता से

W3Schools

गायक छबुराव अहिरेंसह संवादिनी वादक मुकूंद पेटकरांचा सन्मान व्हावा - राजेंद्र लांडगे

देवळाली - आदिवासी कुटुंबातील दुर्लक्षित कलाकार आणि वयाच्या एकोणनव्वोदीतही गायन करणारं व्यक्तीमत्व म्हणजेच ह.भ.प छबुराव महाराज अहिरे आहे.

संगीत क्षेत्रात गायक छबुराव अहिरे सहजतेने रसिकांना मंत्रमुग्ध करतात. 
भारतरत्नाने सन्मानीत प्रती पं.स्व.भीमसेन जोशी नावाने नावलौकिक निर्माण करणारे ह भ प छबुराव महाराज अहिरे हे प्रसिद्ध गायक आहेे. 
म्हणून जुन्या आणि नव्या पिढीला आदर्शवत ठरत असलेने हभप छबुराव अहिरेंना शासनाने विशेष पुरस्काराने सन्मानीत करावे. 
तसेच अकोले सारख्या आदिवासी भागात राहून पद्मविभूषण पंडित स्व जसराज यांच्यासह अनेक दिग्गज आंतरराष्ट्रीय कलाकारांना मोठ्या कौशल्याने संवादिनीची हार्मोनियम साथसंगत करुन अवीरत सेवा करणारे मुकूंद पेटकर या कलाकाराची शासनाने दखल घेत विशेष पुरस्काराने सन्मानीत करावे; 

असे श्रीरामपुर जिल्हा विकास प्रतिष्ठाण संस्थापक अध्यक्ष राजेंद्र लांडगे यांनी सामाजिक भावनेतून प्रतिपादन केले आहे.

राहुरी कारखाना येथे सालाबादप्रमाणे आचार्य बाळशास्री जांभेकर यांचे जयंती निमित्ताने पत्रकारांचे सत्कार समारंभ कार्यक्रमात राजेंद्र लांडगे बोलत होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी दै सार्वमतचे राहुरी तालुका उपसंपादक हेमंत मिसाळ होते.

याप्रसंगी चैतन्य उद्योग समुहाचे अध्यक्ष गणेश भांड यांचा ऑक्युपेशन हेल्थ ॲड सेफ्टी सिक्युरिटी असोसिएशन इंडिया यांच्या वतीने व कोविड योध्दा म्हणूनचा पुरस्कार मिळालेबद्दल हभप छबुराव महाराज अहिरे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. 

नुकताच मिळालेला करोना योध्दा पुरस्कार उद्योजक गणेश भांड यांना निश्चितच प्रेरणादायी ठरेल असेही हभप छबुराव महाराज अहिरे यांनी गुणगौरव करत मनोगत व्यक्त केले. 

उद्योजक गणेश भांड यांचा अखिल भारतीय वारकरी संप्रदाय राहुरी तालुका आणि गणेशदादा भांड प्रतिष्ठान वतीने संपत महाराज जाधव, रामभाऊ जगताप, संजय महाराज शेटे, बाबासाहेब महाराज मोरे यांनी भांड यांचा सत्कार केला. 

विशाल आधार फौन्डेशनचे चंद्रकांत दोंदे पवन उ-हे संकेत संसारे आदिंनीही सत्कार करत मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी हभप छबुराव अहिरे यांचा साई आदर्श मल्टीस्टटचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी कपाळे यांनी सत्कार करत मनोगत व्यक्त केले. 

दै सार्वमतचे राहुरी तालुका उपसंपादक हेमंत मिसाळ यांचेसह दै सार्वमंथन संपादक अनिल कोळसे, पत्रकार वसंत झावरे, गणेश विघे, शिवाजी घाडगे, गणेश आंबीलवादे, रियाज देशमुख, चंद्रकांत लासुरकर, राजेंद्र साळवे, सोपानदेव चौधरी, मनोज हासे, आकाश येवले, प्रवीण पाळंदे, जालींदर आल्हाट, नेल्सन कदम, आशिष संसारे इत्यादींचे सत्कार करण्यात आले.

आयोजीत संगीत मैफलीत हभप छबुराव महाराज अहिरे यांनी भारतरत्न पंडित स्व भीमसेन जोशी यांच्या आवाजातील नावाजलेली अभंगवाणी सादर केली. 
उपस्थित रसिकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले स्वर्गीय पंडित भीमसेन जोशी यांच्या अहिरे महाराजांनी जुन्या आठवणी सांगत काही प्रेरणादायी प्रसंगही विषद केले. 

त्यांना उत्कृष्ट तबला साथसंगत पांडुरंग विधाटे पखवाज गोपीनाथ वर्पे भारत नरोडे प्रसाद गायकवाड संपत महाराज जाधव यांनी करुन संवादिनी साथसंगत राजेंद्र लांडगे यांनी केली. 
कार्यक्रमासाठी ज्ञानदेव शेळके, नितीन कदम, शांताराम राऊत, सचिन काळे, पारस चोरडीया, शिवाजी महाराज शिंदे, निलेश कुंभार, ओंकार गिरी, बालाजी गायकवाड, दिपक नालकर, जयेश लबडे इत्यादी उपस्थित होते; सुत्रसंचलन सर्जेराव शेटे यांनी केले.

Post a Comment

0 Comments

पत्रकारिता के लिए सहायता करें

Follow on Dailyhunt

W3Schools

Contact Form

Name

Email *

Message *

W3Schools