खबरे हर पल सच का सामना हम करते है लोकतंत्र से सच्ची पत्रकारिता से

W3Schools

राहुरी शहर हद्दीतील सरकारी जमीन गट नंबर २३४ मधून होत असलेल्या अवैध मुरूम उत्खननाबाबत तहसीलदारांना निवेदन

अहमदनगर - राहुरी शहर हद्दीतील सरकारी जमिन गट नंबर २३४ मधून होत असलेल्या अवैध मुरूम उत्खननाबाबत सोमवार दिनांक २४ जानेवारी रोजी छावा स्वराज्यरक्षक सेना व जय भिम क्रांती सामाजिक सेवा संघ, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. 
निवेदनात असे म्हटले आहे की, राहुरी तालुक्यात तहसीलदार शेख हे रूजू झाल्यापासून राहुरी तालुक्‍यातील अनेक गावांत अवैध मुरूम उत्खनन मोठ्या प्रमाणात सुरू असून यापूर्वी कनगर, गणेगाव, चिंचविहिरे, ताहराबाद, वडनेर आदी भागांतून अवैध मुरूम उत्खनन राजरोसपणे सुरू होते. 
त्याचे लोण आता राहुरी शहर हद्दीत पसरले असून राज्यमंत्र्यांच्या ताब्यात असलेल्या राहुरी नगरपरिषदेच्या सरकारी गट नंबर २३४ मध्ये असलेल्या कचरा डेपो भागातून 
बबलू घाडगे व दत्तू गायकवाड राहणार जोगेश्वरी आखाडा या दोन मुरूम तस्करांची गेल्या १ ते २ वर्षांपासून खुलेआम मुरूम तस्करी सुरू असून त्यांच्यावर अद्याप पर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही.
संबंधित मुरूम तस्कर यांनी सरकारी जमिनीचे केलेले बेकायदेशीर मुरूम उत्खनन याचा त्वरित पंचनामा करून संबंधितावर त्वरित कारवाई करावी अन्यथा सोमवार दिनांक १४ फेब्रुवारी रोजी राहुरी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा छावा स्वराज्य रक्षक सेना व जय भिम क्रांती सामाजिक सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने देण्यात आला आहे.
निवेदनावर छावा स्वराज्यरक्षक सेना राहुरी तालुका अध्यक्ष नेल्सन कदम, जय भिम क्रांती सामाजिक सेवा संघ महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष सुभाष संसारे आदींच्या सह्या आहेत.

Post a Comment

1 Comments

  1. 1xBet korean review - Betting with 1xBet.co.kr
    1xBet is an online betting site owned by BCLC. You can choose to play games such as football, horse racing, tennis, golf, bingo, 1xbet скачать

    ReplyDelete

पत्रकारिता के लिए सहायता करें

Follow on Dailyhunt

W3Schools

Contact Form

Name

Email *

Message *

W3Schools