खबरे हर पल सच का सामना हम करते है लोकतंत्र से सच्ची पत्रकारिता से

W3Schools

लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा ! महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर

अहमदनगर  : लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा ! महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर
भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं आज सकाळ दीर्घ आजाराने निधन झालं. त्यांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर देशभरात शोककळा पसरली आहे. लतादीदी यांच्या निधनामुळे राज्य सरकारने दुखवटा जाहीर केला आहे.
त्यानिमित्ताने उद्या 7 फेब्रुवारी 2022 रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. लतादीदी यांच्या निधनामुळे केंद्र सरकारनेही राजकीय दुखवटा जाहीर केला आहे.त्यामुळे पुढचे दोन दिवस सर्व सरकारी कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. तसेच मंत्रालयावरील तिरंगा अर्ध्यावर उतरवण्यात आला आहे.
राज्य सरकारने यासंदर्भात काढण्यात आलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, “आज रविवार 6 फेब्रुवारी 2022 रोजी भारतरत्न लता मंगेशकर यांचे दुःखद निधन झाले असून त्यांच्या निधनामुळे संगीत आणि कला विश्वाची अपरिमित हानी झाली आहे. 

या महान गायिकेला श्रद्धांजली वाहण्यासाठी, परक्राम्य संलेख अधिनियम, 1881 ( 1981 चा अधिनियम 26) च्या कलम 25 खाली महाराष्ट्र शासनास सोपविण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून सोमवार 7 फेब्रुवारी रोजी राज्यात दुखवटा म्हणून सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात येत आहे”
दुःखद बातमी - ज्येष्ठ प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांचे निधन.

लता मंगेशकर यांना न्यूज 24 खबर वतीने भावपूर्ण श्रद्धांजली

Post a Comment

0 Comments

पत्रकारिता के लिए सहायता करें

Follow on Dailyhunt

W3Schools

Contact Form

Name

Email *

Message *

W3Schools