अहमदनगर - श्रीरामपूरमध्ये जल्लोष साजरा पंजाब विधानसभा निवडणुकीतील 117 विधानसभेचे निकाल जाहीर हाती येत असतात 117 पैकी 90 च्या वर आम आदमी पार्टीचे उमेदवार पंजाबच्या विधानसभा निवडणुकीत विजय झाल्याने पंजाब चे सत्ता आदमी पार्टी च्या हाती येणार हे स्पष्ट झाल्याने देशभरात आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्याकडून जल्लोष साजरा करण्यात येत आहे.
या सर्वांच्या चालता अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे महात्मा गांधी पुतळ्याजवळ आम आदमीच्या पार्टीच्या वतीने ढोल ताशाच्या गजरात जल्लोष साजरा करण्यात आला या जल्लोषात वेळी छोटे अरविंद केजरीवाल म्हणजेच मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची वेशभूषा धारण करून वेदांत डुंगरवाल हा छोटा अरविंद केजरीवाल पहावयास मिळाला.
यावेळी आम आदमी पार्टीचे नॅशनल कौन्सिल सदस्य किरण उपकारे जिल्हाध्यक्ष तिलक डुंगरवाल, दक्षिण जिल्हा अध्यक्ष किसन आव्हाड, हनीफ बागवान, तालुका अध्यक्ष विकास डोंगरे, जिल्हा कोषाध्यक्ष दिनेश जाधव, प्रवक्ते प्रवीण जमदाडे आदींने मनोगत व्यक्त केले.
ज्याप्रमाणे पक्ष प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीत अतिसुंदर काम करून जनतेची सेवा केली हॉस्पिटल मधील सुधारणा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न मोफत वीज मोफत पिण्याचे पाणी अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याने पंजाबच्या जनतेने देखील आम आदमीच्या पक्षावर विश्वास दाखवून जनतेची सेवा करण्याची संधी दिली .
त्याच प्रमाणे महाराष्ट्रात देखील ही आगामी महापालिका निवडणूक तसेच विविध निवडणुका पूर्ण ताकदीने लढवणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते जल्लोष साजरा करण्यात करताना दिसले.
0 Comments