अहमदनगर - श्रीरामपूर तालुक्यातील कमलपुर येथील ज्ञानेश्वर मोरे यांची पी.एस.आय. पदी निवड झाल्याबद्दल राहुरी फॅक्टरी प्रसाद नगर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले.
त्यांचे बंधू डॉक्टर संतोष मोरे या कार्यक्रमाला उपस्थित होते अतिशय हलाखीच्या परिस्थितीत कष्ट मेहनत करून आज पी.एस.आय .पदी त्यांची निवड झाली आहे.
एक आदिवासी मुलाची पी.एस.आय .म्हणून निवड होते हे फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्यघटने मुळे शक्य होऊ शकले असे प्रतिपादन माजी नगरसेवक ललित शेट चोरडिया यांनी केले .
या प्रसंगी राहुरी फॅक्टरीचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष विक्रांत पंडित व राष्ट्रवादीचे सरचिटणीस कांतीलाल ऊल्हारे यांच्या हस्ते डॉक्टर संतोष मोरे यांचा सत्कार करण्यात आला तर पी.एस.आय. पदी निवड झालेले ज्ञानेश्वर मोरे यांचा सत्कार माजी नगरसेवक ललित शेठ चोरडिया व नगरसेवक ज्ञानेश्वर वाणी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .
यावेळी सामाजिक कार्यकर्ते शरद साळवे, दिलीप धीवर, आसाराम अल्हाट,अंबादास धिवर, आशु सांगळे,
एकलव्य संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यामध्ये पप्पू बर्डे, साईनाथ बर्डे, सुनील बर्डे, आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी माजी नगरसेवक ललित शेठ चोरडिया यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
0 Comments