यंदाच्या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच महिन्यात बँकेतील काम लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. कारण तब्बल १५ दिवस बँकांना वेगवेगळ्या सुट्ट्या असणार आहेत. त्यामुळे बँक कर्मचाऱ्यांची सुट्ट्यांची चंगळ असणार आहे.
बँकिंग रेग्युलेटरी रिझर्व्ह बँकेच्या नियंत्रणाखाली कार्यरत असणाऱ्या बँकांच्या सुट्ट्यांची यादी तयार करते. ही यादी सार्वजनिकही केली जाते. एप्रिलमध्ये बऱ्याच सार्वजनिक सुट्ट्या असून, त्यामुळे महिन्यातील निम्मे दिवस बँकांचं कामकाज बंद राहणार आहे.
एप्रिलमध्ये गुढी पाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, गुड फ्रायडे यासह शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्या अशा सर्व सुट्ट्यांचा समावेश करून १५ दिवस बँकांचं कामकाज बंद असणार आहे. यातील काही सुट्ट्या विशिष्ट राज्यांत आणि भागांसाठीच असणार आहे.
एप्रिलमध्ये बँकांना कोणत्या दिवशी कशामुळे असणार सुट्टी
१ एप्रिल रोजी नवीन आर्थिक वर्ष सुरू होतं. त्यामुळे बहुतांश विभागांमधील बँकांमध्ये व्यवहार होत नाही. एक एप्रिल रोजी बँक खात्यांचं क्लोजिंग केलं जातं.
२ एप्रिल रोजी गुढीपाडवा आहे. त्याचबरोबर उगाडी उत्सव, नवरात्रीचा पहिला दिवस, तेलुगू नववर्ष या निमित्ताने मुंबई, नागपूर, बंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, जम्मू, पणजी, श्रीनगर या झोनमधील बँकांना सार्वजनिक सुट्टी असणार आहे.
३ एप्रिल रोजी रविवार असल्यानं बँकांना साप्ताहिक सुट्टी असते. त्यामुळे कामकाज बंदच असते.
४ एप्रिल रोजी सरहूलच्या निमित्ताने रांची झोनमधील बँकांना सु्ट्टी असणार आहे.
५ एप्रिल रोजी बाबू जगजीवन राम यांची जयंती आहे. या निमित्ताने हैदराबाद झोनमधील बँकांचं कामकाज बंद असणार आहे.
९ एप्रिल रोजी महिन्यातील दुसरा शनिवार आहे. दुसऱ्या शनिवारी बँकांना सुट्टी असते. त्यामुळे कामकाजही बंद असतं.
१० एप्रिल रोजी रविवार आहे. रविवारी साप्ताहिक सुट्टी असल्याने बँकां बंद असतील.
१४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. त्याचबरोबर महावीर जंयती, बैसाखी, तमिळ नववर्ष, बिजू उत्सव, बोहार बिहू या पार्श्वभूमीवर शिलाँग आणि शिमला झोन वगळता देशभरात बँकांना सुट्टी असेल.
१५ एप्रिल रोजी गुड फ्रायडे, बंगाली नववर्ष, हिमाचल दिवस आहे. त्यामुळे जयपूर, जम्मू आणि श्रीनगर वगळता देशभरातील बँकांना सुट्टी असेल.
१६ एप्रिल रोजी बोहाग बिहू असल्याने फक्त गुवहाटीतील बँकांना सुट्टी असणार आहे.
१७ एप्रिल रोजी रविवार असल्यानं बँकांना साप्ताहिक सुट्टी असेल.
२१ एप्रिल रोजी गडिया पूजेच्या निमित्ताने अगरातळामधील बँकांना सुट्टी असेल.
२३ एप्रिल रोजी महिन्यातील चौथा शनिवारी आहे. त्यामुळे सर्वच बँकांमधील कामकाज बंद असेल.
२४ एप्रिल रोजी रविवार आहे. त्यामुळे बँकांना साप्ताहिक सुट्टी असेल.
२९ एप्रिल रोजी शब ए कद्र, जुमात उल विदा यानिमित्ताने जम्मू आणि श्रीनगरमध्ये बँकांना सुट्टी असेल.
सौजन्य - मुंबई तक
0 Comments