राहुरी - तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील विशाल आधार फाउंडेशन चे संस्थापक व अध्यक्ष चंद्रकांत दोंदे व त्यांचा भाऊ विकास दोंदे यांना लाकडी दांड्याने मारहाण करून यांना जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी देवळाली प्रवरा येथील सतीश पठारे व त्याची आई यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
या बाबत चंद्रकांत दोंदे वय २८ ( देवळाली प्रवरा) यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की दि २५ एप्रिल रोजी सांयकाळी ७.३० चा सुमारास मी माझा भाऊ विकास व प्रसाद मुसमाडे व सुनील मिसाळ असे दोन कामगार सतीश पठारे यांच्या घरी फ्रीज आणण्यासाठी टेम्पो मध्ये गेलो असता आम्हाला बघून सतीश पठारे शिवीगाळ करू लागला तुम्ही महाराचे लोक आमच्या दारात का आलात असे म्हणून त्याने हातातील दांडा माझा भाऊ विकास यांच्या उजव्या पायावर मारून गंभीर जखमी केले.
याच वेळ मी सोडवा सोडवी करायला गेलो असता त्याच दांड्याने माझ्या डोक्यात व डाव्या हातावर मारून मलाही जखमी केले .
सतीश पठारे यांच्यासह त्याची आईने ही मला व माझ्या भावास जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण करून टेम्पोचे नुकसान केले .
दरम्यान याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात चंद्रकांत दोंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सतीश पठारे व त्याची आई यांच्या विरोधात
भारतीय दंड विधान कलम ३२६, ३२४, ३२३, ४२७, ५०४, ५०६, अनुसूचित जाती जमाती कायदा कलम ३(१)(s) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे; पुढील तपास पोलिस उपाधीक्षक संदीप मिटके हे करत आहे अशी माहिती आमचे पत्रकार प्रतिनिधी जालिंदर अल्हाट यांनी दिली.
0 Comments