अहो साहेब डासाची उत्पत्ती वाढली फवारणीला मुहूर्त मिळेल का? नगर पालिका प्रशासनाविरुद्ध रोष
राहुरी फॅक्टरी देवळाली शहरात डासांचे प्रमाण वाढले मात्र फवारणी कडे नगरपालिका ठेकेदार चे दुर्लक्ष फवारणी व स्वच्छता विभागाचे दुर्लक्ष राहुरी फॅक्टरी प्रसाद नगर भागातील गेल्या दोन ते तीन महिन्यापूर्वी भूमिगत गटारांचे काम झालेले आहे त्यात चेंबर साफ केली जात नाही
व कोणतेही सफाई कर्मचारी चेंबर साफ करण्या करता येत नाही यातच रात्रीच्या वेळी लोडशेडिंग होत असल्यामुळे नागरिक डासांनी त्रस्त झालेले आहेत असे असताना पालिका प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नाही डास प्रतिबंधक फवारणी करण्यात यावी अशी मागणी नागरिक कडून होत आहे
देवळाली प्रवरा राहुरी फॅक्टरी परिसरात दुपारी व रात्री उशिरा वीज भारनियमन केले जात असल्यामुळे नागरिक डास आणि उकाड्यामुळे त्रस्त झाले आहे नेमकी झोपेची वेळ आणि वीज गुल होत असते वीज गेल्यानंतर महावितरण कंपनीचे अधिकारी व वायरमन यांचे मोबाईल बंद असतात भारनियमनाचे कोणतीही माहिती किंवा मोबाईलवर वीजग्राहकांना संदेश येत नाही नियमाने कितीवेळ भारनियमन करण्यात येत आहे ही माहिती वीज ग्राहकांना देणे बंधनकारक आहे तरीही कोणतीही पूर्वसूचना न देता वीज भारनियमन केले जात असते असा सावळा गोंधळ महावितरणात चालू आहे
विजेची माहिती घेण्यासाठी अधिकारी वायरमन सब टेशन मधील कामगार यांच्याशी संपर्क होऊ शकत नाही त्यांचे मोबाईल बंद झालेले असतात महावितरणाने नागरिकांची झोप उडवायची व दुसरीकडे अधिकारी व कर्मचारी आरामशीर झोपायचा हा प्रकार सध्या या विभागात चालू आहे
भार नियमांची कोणतीही माहिती नसल्यामुळे पालिकेच्या पिण्याच्या पाण्याचे नियोजन कोलमडले आहे शहरात होणारा पाणीपुरवठा उशिरा होता हे भारनियमन रद्द करण्यात यावा व पालिका प्रशासनाकडून फवारणी करण्यात यावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे .
असं न झाल्यास सर्वपक्षीय आंदोलन करण्यात पवित्रा घेण्यात येईल असा इशारा नागरिकांनी दिला आहे
0 Comments