खबरे हर पल सच का सामना हम करते है लोकतंत्र से सच्ची पत्रकारिता से

W3Schools

प्रहार चे वतीने देवळाली प्रवरा येथे दिव्यांग बांधवांसाठी शिबिर संपन्न

देवळाली प्रवरा - दि. ४ एप्रिल दिव्यांग बांधवांना रेल्वे पास मिळण्यासाठी देवळाली प्रवरा येथे प्रहार दिव्यांग संघटनेचे वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र येथे शिबिर संपन्न झाले. 
      
या शिबिराचे आयोजन राहुरी तालुका प्रहार दिव्यांग संघटनेचे सल्लागार तथा देवळाली प्रवरा शहर अध्यक्ष सलीमभाई शेख यांचे जन्मदिनाच्या निमित्ताने करणेत आल्याची माहिती प्रहार दिव्यांग चे तालुका अध्यक्ष मधुकर घाडगे यांनी दिली. 

या शिबीर प्रसंगी प्रमुख उपस्थिती मध्ये प्रहार जनशक्ती पक्षाचे श्रीरामपूर विधानसभा अध्यक्ष आप्पासाहेब ढुस, बांधकाम कामगार संघटना चे शहर अध्यक्ष विजय कुमावत, प्रहार दिव्यांग चे तालुका उपाध्यक्ष विठ्ठल पांडे, सचिव योगेश लबडे, अनिल मोरे, रूपाली ताई जाधव, रवींद्र भुजाडी, भास्कर दरंदले, तुकाराम बाचकर, राजू धनवट, अनामिका हारेल, गुलाब भाई पठाण, संदीप बोरसे, वैभव थोरात, जालिंदर भोसले आदी मोठ्या संख्येने प्रहार दिव्यांग चे पदाधिकारी उपस्थित होते. 
       
दिव्यांग बांधवांसाठी रेल्वे पास मिळण्यासाठी शिबिरांचे आयोजन करणेसाठी देवळाली प्रवरा प्राथमिक आरोग्य केंद्राने सहकार्य केलेबद्दल डॉ मासाळ व डॉ शेख यांचे आप्पासाहेब ढुस यांनी आभार मानले. 
 
सोमवार दिनांक ४/४/२०२२ रोजी सकाळी ८ ते ११ या वेळेत ४५% पेक्षा जास्त दिव्यांग टक्केवारी असलेले ऑनलाईन प्रमाणपत्र धारक दिव्यांग व १००% अंध असणाऱ्या बंधू-भगिनींना रेल्वे सवलत पास काढणेसाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी आधार कार्ड ऑनलाईन प्रमाणपत्र, ०६ पासपोर्ट फोटो, युनिक कार्ड झेरॉक्स, आधार कार्ड व ज्यांच्या कडे युनिक कार्ड नाही त्याना सुद्धा या प्राथमिक आरोग्य केंद्र देवळाली प्रवरा या ठिकाणी शिबिरात सहकार्य केले गेले.      
          
रेल्वे पास साठी तपासणी करून सर्व कागदपत्र च्या तीन प्रति तयार करून अहमदनगर रेल्वे स्टेशन येथे संघटनेचे वतीने रेल्वे मध्ये दिले जातील त्यावर दिव्यांग चे जोडीदार यांना ७५% भाडय़ात सवलत मिळणार असल्याची माहिती या प्रसंगी सलीम शेख यांनी दिली.

Post a Comment

0 Comments

पत्रकारिता के लिए सहायता करें

Follow on Dailyhunt

W3Schools

Contact Form

Name

Email *

Message *

W3Schools