खबरे हर पल सच का सामना हम करते है लोकतंत्र से सच्ची पत्रकारिता से

W3Schools

प्रहार वतीने देवळाली प्रवरात हुतात्म्यांना अभिवादन

देवळाली प्रवरा - १ मे महाराष्ट्र दिन निमित्ताने देवळाली प्रवरा येथे प्रहार जनशक्ती पक्षाचे वतीने हुतात्मा स्मारकाला अभिवादन करणेत आले.  
या प्रसंगी प्रमुख उपस्थितीत माजी सनदी अधिकारी दत्ता कडू पाटील, प्रहार चे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आप्पासाहेब ढुस, देवळाली प्रवरा शहर अध्यक्ष विजय कुमावत, राहुरी फॅक्टरी शहर अध्यक्ष शरद वाळुंज, देवळाली प्रवरा शहर महिला अध्यक्ष भाग्यश्री कदम, राहुरी फॅक्टरी महिला शहर अध्यक्ष रजनीताई कांबळे, देवळाली प्रवरा शहर उपाध्यक्ष अबिद शेख, ओंकार मुसमाडे, राहुरी फॅक्टरी शहर उपाध्यक्ष एकनाथ वाणी, प्रभाकर कांबळे, अमोल साळवे, आराध्या आदी उपस्थित होते.

प्रसंगी बोलताना दत्ता कडू पाटील म्हणाले की, आज महाराष्ट्र दिन, कामगार दिन !! तुम्हां सर्व मराठी मित्र मैत्रीणींना मनःपुर्वक शुभेच्छा. १ मे १९६० मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र अस्तीत्वात आला. 
हे राज्य अस्तीत्वात येण्यासाठी १०५ हुतात्म्यांनी या चळवळीत प्राणाचे बलिदान दिले. त्यांचे स्मरण करत आदरांजली वाहण्याचा आजचा दिवस. या आंदोलनात कामगारांचा मोठा सहभाग होता. स का.पाटील न् मोरारजी देसाई यांचा मुंबई महाराष्ट्राला न देण्याचा दुराग्रह संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाने हाणुन पाडला. तत्कालीन केंद्रीय अर्थमंत्री सी डी देशुमखांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा देत या चळवळीला धार प्रदान केली. 

शाहिर अमरशेख, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे, एस् एम जोशी यांनी या आंदोलनात प्रचंड योगदान दिले. संयुक्त 

महाराष्ट्र चळवळीस डॅा बाबासाहेब आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे तसेच प्र के अत्रेंचा मोठा पाठिंबा होता. त्यांनी अनेक सभा घेत या मागणीला पाठिंबा दिला.

आजच्या दिवशी हुताम्याचे स्मरण करताना व हा दिवस साजरा करताना मराठी माणसाने ह्या लढ्याचे स्मरण करणे गरजेचे आहे. परंतु गेल्या काही दिवसांत पुरोगामी महाराष्टा्त जो काही अस्थिर वातावरणाचा न् नको त्या प्रतीगामी विचाराचा कल्लोळ माजला आहे. त्या पार्श्वभुमीवर हे स्मरण न् चिंतन नव्या पिढीने करण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे. 

१०५ हुतात्मे सर्वसामान्य कामगार न् नागरिक होते. त्यांची नांवे एकदा नजरेखालुन घाला. त्यात हिंदु , ख्रिश्चन , पारशी , मुस्लीम, शिख, मागासवर्गीय सर्व जातीच्या मंडळीचा समावेश असल्याचे दिसुन येईल.

हुतात्म्यांची जातीवार विभागणी करणे मुळात क्लेशदायक बाब आहे. परंतु आजच्या जातीच्या न् धर्माचे प्रचंड वेड धारण केलेल्या पिढीला हा संदर्भ मनाला पटत नसताना देखील द्यावा लागतो आहे.

महाराष्ट्राने गेल्या ६२ वर्षात काय कमावले न् काय गमावले याचा लेखाजोखा सर्वजण आपल्यापरीने मांडतील.परंतु या राज्याने देशाला दिशादर्शक ठरतील अश्या अनेक गोष्टी दिल्या आहेत.त्यात रोजगार हमी कायदा, महिला धोरण, जमीन सुधारणा कायदे यांचा समावेश आहे. 

देशाचे तिजोरीत सर्वात जास्त टका महाराष्ट्र देतो आहे. यापेक्षाहि या महाराष्टा्ने उत्तर भारतीय तसेच इतर राज्यातुन आलेल्या अमराठी माणसांना रोजगार देत सांभाळले आहे. वारकरी सांप्रदयाचा वारसा लाभलेले हे महा राज्य पुरोगामी हे बिरुद अभिमानाने मिरवत होता, मिरवत आहे. 

या देशाला आदर्श बनविण्यात महाराष्ट्र अव्वल होता आणि राहिल आभार प्रहार चे शहर अध्यक्ष विजय कुमावत यांनी मांडले.

Post a Comment

0 Comments

पत्रकारिता के लिए सहायता करें

Follow on Dailyhunt

W3Schools

Contact Form

Name

Email *

Message *

W3Schools