यावेळी चर्मकार समाजाच्या विविध विषयावर चर्चा करण्यात आली तसेच चर्मकार समाजाला घरकुल योजना मिळवून देण्यासाठी प अखिल भारतीय परिवर्तन गुरू रविदास सेना आवाज उठणार असे आव्हान संस्थापक अध्यक्ष देविलाल बिरसोने यांनी केले चर्मकार समाजाच्या विविध विषयावर सखोल चिंतन मार्गदर्शन.
देवीलाल बिरसोने यांनी उपस्थित समाजाला व कार्यकर्त्यांना सांगितले संघटित होण्याची गरज आहे जर ही वेळात आपण संघटित झालो नाही तर पुढची दिशा भयंकर राहणार आहे, असे मार्गदर्शन देवीलाल बिरसोने साहेब यांनी केले, त्यानंतर संघटनेचे सल्लागार संतोष साबणे, यांनी मार्गदर्शन केले की समाजातील सभासद होऊन दोनशे रुपये वार्षिक वर्गणी संघटनेला द्यावी या वर्गणी मार्फत संघटनेच्या वतीने अनेक कार्य घेतले जातील.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश सचिव राहुल करणाडे, जालना जिल्हा उपाध्यक्ष फकीरा बिरसोने, जालना जिल्हा शहर अध्यक्ष नारायण भक्कड औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष शरद धंतोले, ज्येष्ठ समाजसेवक प्रकाश जटाळे, मराठवाडा अध्यक्ष राजू काकडे यांनी आपले विचार मनोगत व्यक्त केले तसेच आभार जालना तालुका अध्यक्ष राम खैरे यांनी मानले, यावेळी गजानन शिंगणे, महाराष्ट्र प्रदेश सचिव शरद सुटे, रवी कदम, विलास मगर, संतोष भगुरे, राहुल जाटवे, किशोर रईवाले, व तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.
0 Comments