अहमदनगर - दि. २३ मे देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेवर अहमदनगरचे जिल्हाधिकारी मा. राजेंद्र भोसले साहेब यांचे समोर सुनावणी पार पडली.
प्रहार जनशक्ती पक्षाचे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आप्पासाहेब ढुस यांनी देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेवर हरकत घेतली होती.
त्यामध्ये देवळाली नगरपालिकेने प्रगणक गट दर्शक नकाशा प्रसिद्ध न करता कोरा नकाशा प्रसिद्ध केलेने हरकत घेता आल्या नाही ही ढुस यांची हरकत जिल्हाधिकारी मा. भोसले साहेब यांनी सर्वप्रथम मान्य केली व ढुस यांना तात्काळ प्रगणक गट दर्शक नकाशा उपलब्ध करून त्यांची हरकत नोंदवीनेचे मुख्याधिकारी यांना आदेश दिले.
मा. जिल्हाधिकारी साहेब यांनी प्रगणक गट दर्शक नकाशा उपलब्ध करून देणेचा आदेशानुसार मुख्याधिकारी यांनी नकाशा उपलब्ध करून दिल्यानंतर मा. उप जिल्हाधिकारी साहेब तसेच देवळाली प्रवरा नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांचे समवेत आप्पासाहेब ढुस तसेच हरकती साठी उपस्थित रिपाई चे जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र थोरात, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे देवळाली शहर अध्यक्ष केदारनाथ चव्हाण, काँग्रेस चे दादा गिरमे, अरुण ढुस आदींनी प्रभाग रचना तपासून त्यावर हरकती नोंदविल्या. पैकी मा. जिल्हाधिकारी साहेब यांनी एक हरकत मान्य केली, तर दुसरी हरकत अमान्य केली.
देवळाली प्रवरा नगरपरिषदेच्या या प्रारूप प्रभाग रचनेस हरकत घेणेसाठी सत्तारूढ गटाचे कोणीही हजर नव्हते किंवा त्यांची एकही हरकत नसल्याने विरोधी गटाचे उपस्थित सदस्यांनी शंका उपस्थित केली.
0 Comments