खबरे हर पल सच का सामना हम करते है लोकतंत्र से सच्ची पत्रकारिता से

W3Schools

देवळाली चे शिवाजी मुसमाडे, गणेश भालके, करण सोनवणे प्रहार मध्ये दाखल

देवळाली प्रवरा - दि. २४ मे देवळाली प्रवरा मधील शिवाजी मुसमाडे, गणेश भालके, करण सोनवणे यांनी जिल्हाध्यक्ष अभिजीतदादा पोटे व श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आप्पासाहेब ढुस यांचे नेतृत्वाखाली प्रहार जनशक्ती पक्षामध्ये नुकताच प्रवेश केला.
देवळाली प्रवरा शहरामध्ये नामदार बच्चूभाऊ कडू यांचे प्रहार संघटनेचे कार्य व कामाचा धडाका पाहून त्यांना मानणारा वर्ग वाढत असून मोठ्या संख्येने युवक प्रहारकडे आकर्षित झाले आहेत. 
त्याचाच एक भाग म्हणून शिवाजी मुसमाडे, गणेश भालके, करण सोनवणे प्रहार मध्ये दाखल आहेत.. त्याबद्दल शिवाजी मुसमाडे यांना देवळाली प्रवरा शहर अध्यक्ष विजय कुमावत यांचे हस्ते देवळाली शहर उपाध्यक्ष पदी नेमणूक देणेत आली, तसेच राहुरी फॅक्टरी येथील गणेश भालके यांना राहुरी फॅक्टरी शहर अध्यक्ष शरद वाळुंज यांचे हस्ते राहुरी फॅक्टरी शहर उपाध्यक्ष पदी नियुक्ती देणेत आली असून, प्रसादनगर मधील करण सोनवणे यांना प्रसादनगर शाखा अध्यक्ष अमोल साळवे यांचे हस्ते शाखा उपाध्यक्ष पदी नियुक्ती देणेत आली.
सर्व नवनियुक्त पदाधिकारी यांचे प्रहारच्या श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आप्पासाहेब ढुस यांनी अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments

पत्रकारिता के लिए सहायता करें

Follow on Dailyhunt

W3Schools

Contact Form

Name

Email *

Message *

W3Schools