अहमदनगर - दि. ४ मे २०२२ अहमदनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात साखर कारखानदार आणि जिल्हाधिकारी यांच्यात चालू असलेल्या बैठकीत प्रहार ने गनिमी कावा करून प्रवेश मिळवला - अभिजीत पोटे
आज दिनांक 4 मे रोजी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये नियोजन हॉलमध्ये कलेक्टर व अहमदनगर जिल्ह्यातील सर्व साखर कारखानदार आणि साखर सहाय्यक आयुक्त यांच्यासह साखर कार्यालयाचे सर्व अधिकारी यांची अतिरिक्त झालेल्या उसा बाबत ऊस गाळपासाठी बैठक नियोजन सुरू होते या बैठकीत गनिमीकावा करत प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष अभिजित दादा पोटे जिल्हा कायदेशीर सल्लागार एडवोकेट पांडुरंग आवताडे, प्रहार श्रीरामपुर विधानसभा अध्यक्ष अप्पासाहेब ढुस यांनी बैठकीत प्रवेश केला.
बैठक सुरू असताना जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी अहमदनगर जिल्ह्यातील सर्वच ऊस उत्पादक शेतकर्यांचा अतिरिक्त झालेला उसाचा प्रश्न सुटू पर्यंत कोणीही कारखाने बंद करू नये असे जाहीरपणे सांगितले.
त्यावर कारखानदारांनी प्रतिक्रिया देत ऊस कामगारांअभावी ऊस तोडणे शक्य नसल्याचे कारण दिले..
ऊस तोडणी हार्वेस्टर उपलब्ध आहेत परंतु त्यामागे लागणारी वाहने ट्रॅक्टर आणि ट्रक उपलब्ध नसल्याचे कारण सांगितले..
या यंत्रणेने अभावी आम्हाला ऊस तोडणे शक्य नसल्याने आम्ही ऊसतोड करू शकणार नाही पर्यायाने उस कारखान्यात न आल्याने कारखाने बंद केल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही कारखाने नोकेन झाल्याने कारखाने तोट्यात चालतील असे सोपस्कार बनावट उत्तर जिल्हाधिकाऱ्यांना देण्याचे काम सुरू असतानाच प्रहार जनशक्ती पक्षाचे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष अभिजीत दादा पोटे यांनी जिल्हाधिकारी याांना अतिरिक्त ऊस प्रश्नावर निवेदन देऊन बोलण्याची परवानगी मागितली.
जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी देताच विविध शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधीन कडे दररोज शेकडो शेतकरी बांधवांच्या ऊसाला तोड नसल्याबाबत च्या तक्रारी तसेच ऊसतोडीसाठी अडवणूक करून पैसे घेतल्याच्या तक्रारी दररोज प्राप्त होत असल्याचे सांगितले.
बैठकीत बसलेल्या सर्व कारखानदारांना प्रश्न विचारला तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रातला ऊस न तोडता त्यात क्षेत्रातल्या उसाच्या खोडक्या करून नव्वद शंभर किलोमीटर लांब अंतरावरून उस आणून कशासाठी गाळप केले तसेच उसाची नोंद करणारी सर्वच कारखानदारांची यंत्रणा बनावट असल्याचे जाहीरपणे सांगितले.
त्यात कुठलीच पारदर्शकता नाही जाणून-बुजून जवळच्या शेतकऱ्याची ऊस नोंद करायला साखर कारखाने टाळाटाळ करत असतात.
वास्तविक परिस्थिती पाहता ऊस तोड कामगार आपापल्या गावी निघून चालले असले तरी ऊसतोड हार्वेस्टर आणि त्यामागे चालणारी यंत्रणा म्हणजे ट्रॅक्टर आणि ट्रक यांना ड्रायव्हर व्यतिरिक्त अतिरिक्त कामगार लागत नसल्याने सर्व कारखानदार मिळून जिल्हाधिकारी यांची दिशाभूल करत असल्याचे जिल्हाध्यक्ष अभिजीत पोटे यांनी ही बाब लक्षात आणून दिली असता जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी पोटे यांच्या भूमिकेचे स्वागत करून साखर सहआयुक्त मिलिंद भालेराव यांना प्रहार जनशक्ती पक्षाच्या निवेदनावर तातडीने जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ६ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी तसेच ऊस वाहतूकदारांचे प्रतिनिधी यांच्यासह तातडीने बैठक घेण्याचे निर्देश दिले.
0 Comments