अहमदनगर - देवळाली प्रवरा नगर परिषद निवडणूक आरक्षण जाहीर आगामी होणाऱ्या देवळाली प्रवरा नगरपरिषदेच्या निवडणूकीसाठी राज्य निवडणूक यांच्या आदेशानुसार अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील महिला आरक्षणाची सोडत एकूण प्रभाग 1 ते 10 साठी आज आज सोमवार दिनांक 13/06/22 रोजी काढण्यात आली.
देवळाली प्रवरा नगरपालिकेचे समर्थ बाबुराव पाटील सांस्कृतिक भवनात भूसंपादनचे उपजिल्हाधिकारी जयश्री आव्हाड तसेच मुख्याधिकारी अजित निकत यांच्या अधिपत्याखाली ही सोडत काढण्यात आली. यावेळी कु.वेदिका सूर्यवंशी व कु.राधिका पठारे या लहान मुलीच्या हस्ते आरक्षणाच्या चिठ्या काढण्यात आल्या.
यावेळी मोठ्या संख्येने नगरपालिका निवडणूकिसाठी इच्छुक असलेले उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रभाग :- १ अ सर्वसाधारण महिला
ब सर्वसाधारण
प्रभाग :- २ अ सर्वसाधारण महिला
ब सर्वसाधारण
प्रभाग :- ३ अ अनुसूचित जाती महिला ब सर्वसाधारण
प्रभाग :- ४ (३ जागा)
अ अनुसूचित जाती महिला
ब सर्वसाधारण महिला
क सर्वसाधारण
प्रभाग :- ५ अ सर्वसाधारण महिला
ब सर्वसाधारण
प्रभाग :- ६ अ अनुसूचित जमाती महिला
ब सर्वसाधारण
प्रभाग:- ७ अ अनुसूचित जाती
ब सर्वसाधारण महिला
प्रभाग :- ८ अ सर्वसाधारण महिला
ब सर्वसाधारण
प्रभाग :- ९
अ सर्वसाधारण महिला
ब सर्वसाधारण
प्रभाग :- १० अ सर्वसाधारण महिला
ब सर्वसाधारण
आरक्षण व सोडतीच्या अनुषंगाने हरकती व सूचना मागविण्याचा कालावधी 15 जून ते 21 जून असणार आहे.
0 Comments