अहमदनगर - राहुरी फॅक्टरी येथील तरुण ओमकार दादासाहेब पुंड वय वर्ष 19 ह्या तरुणाने दोन दिवसापूर्वी स्विफ्ट कार खरेदी केली होती.
बुधवारी रात्री साडेनऊ ते दहा च्या सुमारास श्रीरामपूर वरून तो आपल्या घराकडे राहुरी फॅक्टरी निघाला होता विश्रामगृह देवळाली प्रवरा येथे आला असता गाडीने दोन ते तीन वेळा पलटी घेऊन रस्त्याच्या खाली उतरली .
अधिक माहिती अशी की राहुरी फॅक्टरी आदिनाथ वसाहत मधील 19 वर्षीय तरुण ओंकार दादासाहेब पुंड हा घरी जात असताना स्विफ्ट कार नंबर एम .एच. 14 एफ .सी .1205 गाडी पलटी होऊन ओमकार पुंड हा तरुण गंभीर जखमी झाला त्याला कारमधून तातडीने काढण्यात आले .
हि अपघाताची माहिती कळताच माजी नगरसेवक आदिनाथ कराळे, जगन्नाथ मुसमाडे, विक्रम फाटे, महेश पवार व परिसरातील नागरिक व सामाजिक कार्यकर्ते अपघात स्थळी दाखल झाले .
जखमी अवस्थेत असलेला ओंकार दादासाहेब पुंड या तरुणाला भीम तेज मित्र मंडळाच्या रुग्णवाहिकेमधून तातडीने राहुरी येथील सरकारी दवाखान्यात नेण्यात आले.
उपचारापूर्वी वैद्यकीय सूत्रांनी ओमकार पुंड यास मयत घोषित केले .
ओंकारच्या पश्चात आई, वडील, बहीण व मोठा मित्र परिवार आहे ओंकारच्या अपघाती निधनामुळे राहुरी फॅक्टरी परिसरात मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
0 Comments