अहमदनगर - राहता तालुक्यातील पुणतांबा येथे श्री चांगदेव नगर परिसरात असलेल्या श्री बुद्ध विहार येथे राजेश विनायक शिरसाठ व त्यांची पत्नी ज्योती राजेश शिरसाठ हे नेहमीप्रमाणे बौद्ध वंदना करण्यासाठी गेले असता तिथे सौ ज्योती शिरसाठ या ब्लॉक वर स्वच्छता करत असताना एक आरोपी तुषार संदीप पुंडे यांनी चिखलाने भरलेली दुचाकी बौद्ध विहाराच्या ब्लॉक वर घेतली तेव्हा राजेश विनायक शिरसाठ त्या तरुणास म्हणाले की चिखलाने भरलेले मोटरसायकल येथे घेऊन येऊ नका असे म्हटल्याचा राग आल्याने हा प्रकार आरोपीचा मित्र अविनाश धनवटे यांनी ऐकला व तो मोटरसायकल घेऊन ब्लॉक वर फिरू लागला तेव्हा ब्लॉक चिखलाने आणखीन खराब झाला तुम्ही मोटरसायकल फिरू नका तेव्हा आरोपींनी या पती-पत्नी जागा काय तुमच्या बापाची आहे का असे म्हणत जातिवाचक शिवीगाळ केली व आमचे कुणी काही वाकडे करू शकत नाही असे म्हणत लाथा भुक्क्याने बेदम मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली.
महिलेस लाथा बुक केले मारहाण केली तुमचा नेहमीचा त्रास असतो असे म्हणत आरोपींनी पुन्हा शिवीगाळ करून आमच्या आमच्या नादी लागलास तर तुम्हाला जीवे ठार मारून टाकू कशी धमकी दिली सायंकाळी सात वाजता हा प्रकार घडला .
यावेळी राजेश विनायक शिरसाठ धंदा नोकरी शेती महामंडळ कॉलनी आठरावाडी चांगदेव नगर पुणतांबा यांच्या फिर्यादीवरून राहता पोलीसात आरोपी अविनाश काशिनाथ धनवटे अविनाशची आई आशा काशिनाथ धनवटे अविनाशचा मामा पूर्ण नाव माहित नाही व अविनाश चा चुलता विश्वनाथ महादू धनवटे तुषार संदीप पुंडे सर्व राहणार अठरा वाडी चांगदेव वाडी पुणतांबा यांच्या विरुद्ध भा.द.वी. कलम 143. 147. 149. 323 .504. 506 अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा 1989 चे कलम 3(1) (आर )(एस) प्रमाणे ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून डी .वाय .एस .पी .सातव पोलीस निरीक्षक गायकवाड यांनी घटनास्थळी भेट दिली.
व आरोपी अविनाश धनवटे या दोघांना पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास डी .वाय .एसपी .सातव हे करत आहे.
या घटनेची माहिती मिळताच भीमसैनिक प्रदीपभाऊ थोरात व त्यांचे सहकारी तुषार दिवे आधी भीमसैनिक पीडित कुटुंबीयांना भेटण्याकरता गेले होते अशी माहीती जिल्हा प्रतिनिधी जालिंदर अल्हाट यांनी दिली.
0 Comments