देश विदेशातील गणेशभक्तांचे प्रमुख आकर्षण असणाऱ्या वैभवशाली विसर्जन मिरवणुकीला शुक्रवारी दिमाखात प्रारंभ झाला.
दोन वर्षांच्या कालावधीनंतर निर्बंधमुक्त उत्सव साजरा होत असल्याने गणेशभक्तांच्या आनंदाला उधाण आल्याचे चित्र विसर्जन मिरवणुकीत दिसून आले.
मात्र शहरातील मानाच्या गणपतींची विसर्जन मिरवणुक मोठ्या उत्साहात प्रारंभ झाली यामध्ये लहानपासून मोठे मोठ्याप्रमाणावर सहभागी झाले होते .
सिद्धिविनायक गणेश मित्र मंडळ राहुरी फॅक्टरी सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या उत्साहात पार पडली.
तर दुसरीकडे - राहुरी फॅक्टरी, देवळाली प्रवरा, शेटेवाडी, वाणीमाळा, गुरुकुल वसाहत, प्रसाद नगर, अंबिका नगर, समर्थ नगर, अशा भागातून नगरपालिकेने गणेश मूर्ती संकलन करण्याचा रथ दारोदारी फिरवला होता.
ठिकाणाहून गणेश मूर्तीचे संकलन करून राहुरी फॅक्टरी येथील पाण्याच्या टाकीजवळ कृत्रिम तलाव बनवण्यात आला होता; सर्व गणेश मूर्ती विसर्जनासाठी या कृतीम तलावामध्ये विसर्जित करण्यात आले आहे
माजी वसुंधरा अभियाना अंतर्गत देवळाली नगरपालिकेने घरोघरी जाऊन गणेश मूर्तीचे संकलन करून कृत्रिम तलाव मध्ये विसर्जित करण्यात आले आहे ;
यामध्ये देवळाली नगरपालिकेचे मुख्याधिकारी अजित निकत यांच्या मार्गदर्शनाखाली हा अतिशय सुंदर असा उपक्रम राबविण्यात आला तसेच यामध्ये देवळाली नगर पालिकेचे सर्व कर्मचारी तसेच ग्रामस्थांनी या उपक्रमाला मोठा प्रसिद्ध प्रतिसाद दिला आहे.
0 Comments