अहमदनगर -राहुरी सुमारे सात महिन्यापूर्वी राहुरी शहरात गावठी कट्ट्यातून फायर झाल्याची घटना घडली होती.
त्यावेळी दोन गटात झालेला वाद आज पुन्हा उफाळून आला. आणि राहुरी पोलीस ठाण्याच्या आवारात दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना आज घडली.
राहुरी शहरातील एकलव्य वसाहत येथे सुमारे सात महिन्यापुर्वी दोन गटात वाद निर्माण होऊन बोळीबार झाल्याची घटना घडली होती.
तेव्हापासून दोन्ही गटातील धुमश्चक्री चालूच आहे. तो वाद आज पून्हा उफाळून आला.
दिनांक 27 /9/ 2022 दुपारी एक वाजण्याच्या सुमारास राहुरी पोलीस ठाण्याच्या आवारात त्या दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली. दोन्ही गट एकमेकांवर तूटून पडले होते.
सात महिन्यांपूर्वी राहुरी शहरातील एकलव्य वसाहत येथे माजी नगरसेविका सोनाली बर्डे यांच्यावर येथिल तरुणाने गोळीबार करत हल्ला केला होता.
त्यावेळी पोलिस ठाण्यात आर्म ॲक्ट सह प्राणघातक हल्ला करणे या कलमान्वये सोनाली बर्डे यांच्या फिर्यादीवरून नामदेव पवार, अमर पवार, अंकुश पवार यासह चार ते पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सध्या आरोपींची जामिनावर सुटका झालीय. मात्र तेव्हापासून पवार, माळी व बर्डे या कुटुंबात कायम धुसफूस सुरू आहे.
पोलीस ठाण्याच्या आवारात तुंबळ हाणामाऱ्या झाल्याने काही काळ नागरिकांमध्ये चांगलीच पळापळ झाली होती. पोलिस पथकाने तात्काळ काही महिला व पुरूषांना ताब्यात घेतले.
कोणीतरी प्रतिष्ठित व्यक्तीने हा दोन्ही गटातील वाद सामंजस्यपणे मिटवीणे गरजेचे आहे. अन्यथा अनेक महिन्यांपासून सुरू असलेला हा वाद भविष्यात अत्यंत विकोपाला जाऊन मोठी दुर्घटना घडण्याचे चिन्ह दिसत आहे.
याबाबत दुपार उशीरा पर्यंत राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
0 Comments