या स्पर्धेत राज्यातून सर्व जिल्ह्याचे विद्यार्थी व प्रशिक्षक आले होते.
भोकरदन शहरातील प्रसिद्ध शोतोकाॅन कराटे व क्रीड़ा मंडळ जिल्हा जालना भोकरदन प्रशिक्षक व अंतराष्टीय कोच अनिल पगारे यांचे विद्यार्थी यांनी या कराटे स्पर्धेत यशस्वी कामगिरी केली.
या मध्ये चार स्वर्ण (Gold) पदक आठ रोप्य पदक (Silver) दोन कांस्य पदक (Bronze) पदकांची चमकदार अशी कमाई केली आहे .
यात विजयी खेळाडु यांची नावे अशी आकांशा काकफळे प्रथम क्रमांक, आदित्य जंजाळ द्वितीय क्रमांक, तनुजा साबळे प्रथम क्रमांक, जान्हवी सोनुने द्वितीय क्रमांक, राहुल पवार द्वितीय क्रमांक, पैठणकर अथर्व द्वितीय क्रमांक,भारती गाढ़े द्वितीय क्रमांक, यश दांडगे तिसरा क्रमांक
विराज झोरे प्रथम क्रमांक, आर्रव जंजाळ प्रथम क्रमांक या प्रकारे यांनी कामगिरी करत पदके मिळवली आहे.
जालना जिल्ह्य़ातील भोकरदन तालुक्यातील या सर्व विद्यार्थी व प्रशिक्षक यांचे तालुका आणि शहरात अभिनंदन होत आहे. अशी माहिती आमचे भोकरदन प्रतिनिधी साबीर शेख यांनी दिली.
0 Comments