अहमदनगर - काल रात्री पासून बेपत्ता असलेल्या डिग्रस येथील ३० वर्षीय सुरक्षा कर्मचारी असलेल्या तरुणाचा मृतदेह आज राहुरी विद्यापीठातील एका शेत तळ्यात आढळून आला.
त्याचा खूण करण्यात आल्याची चर्चा सुरू असून या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
सचिन इंद्रभान गावडे, वय ३० वर्षे, राहणार डिग्रस, ता. राहुरी. हा तरूण महात्मा फुले कृषी विद्यापीठात सुरक्षा कर्मचारी म्हणून कार्यरत होता.
त्याने काल रात्री बारा वाजे पर्यंत ड्युटी केली. ड्युटी संपल्यावर तो घरी जाण्यासाठी निघाला होता. परंतू तो घरी पोहचलाच नाही. त्याचे नातेवाईक रात्रीपासून त्याचा शोध घेत होते.
आज दिनांक ३० सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजे दरम्यान त्याच्या घरापासून सुमारे १०० फूट अंतरावर नारळाच्या बागे जवळील एका शेत तळ्या जवळ त्याची मोटरसायकल व बूट दिसून आले.
संशय आल्याने मुळानगर येथील संतोष पवार, नामदेव पवार, अशोक गायकवाड, संतोष गायकवाड या तरूणांनी शेत तळ्याच्या पाण्यात त्याचा शोध घेतला.
बराच वेळ शोध घेतल्या नंतर शेत तळ्यात त्याचा मृतदेह मिळून आला. मृतदेह पाहून त्याच्या नातेवाईकांनी हंबरडा फोडला.
घटनास्थळी डिग्रस येथील सरपंच रावसाहेब पवार, दत्तात्रय पटेकर, विशाल थेटे, सोपान गावडे,काका गावडे, राजेंद्र थेटे आदिंसह परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी पाठवीला.
सचिन गावडे या तरूणाला मारहाण करून तळ्यात टाकले आणि त्याचा खूण केला. अशा वेगवेगळ्या चर्चा या परिसरात सुरू होती.
या घटने बाबत सायंकाळी ऊशीरा पर्यंत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. मात्र या घटनेने विद्यापीठ परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
0 Comments