देवळाली प्रवरा - दि. ४ ऑक्टोबर माजी मंत्री तथा प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आ. बच्चुभाऊ कडू यांचे निधीतून अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्याच्या देवळाली प्रवरा या ठिकाणी भंडारदरा धरणाच्या कालव्यावर जवळपास 30 लक्ष रुपये खर्चाचे तीन पदाचारी लोखंडी फुलांची उभारणी केली.
या पुलांमुळे कालव्याचे दोन बाजू जोडून निव्वळ रस्ताच तयार झाला नसून देवळाली प्रवरा शहरवासीयांची मने त्यातून जोडली गेली असल्याचे प्रतिपादन प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष अभिजीत पोटे यांनी केले.
प्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा संघटक बाळासाहेब खर्जुले, प्रहार सोशल मीडिया जिल्हाप्रमुख संजय वाघ, प्रहार श्रीरामपूर विधानसभा उपाध्यक्ष लक्ष्मणराव खडके, प्रहार कामगार संघटना श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ क्षेत्र प्रमुख बाळासाहेब कराळे,
नेवासा तालुका अध्यक्ष जालिंदर आरगडे, श्रीरामपूर तालुका वरिष्ठ उपाध्यक्ष दीपक पटारे, श्रीरामपूर तालुका युवक अध्यक्ष रघुनाथ शिंदे, श्रीरामपूर तालुका संघटक रमेश भालके ,
श्रीरामपूर तालुका युवक कार्याध्यक्ष भैरवनाथ कांगुने, प्रहार देवळाली प्रवरा शहर अध्यक्ष विजय कुमावत, प्रहार राहुरी फॅक्टरी शहर अध्यक्ष शरद वाळुंज, उपाध्यक्ष एकनाथ वाणी, गणेश भालके, प्रहार देवळाली प्रवरा महिला शहराध्यक्ष भाग्यश्री कदम,
उपाध्यक्ष सुरेखा पंडित, आशा माळी, अफसाना शेख, वंदना कांबळे, दिव्यांग संघटना शहर अध्यक्ष सलीम शेख, संघटक सनी सोनवणे, ज्येष्ठ नागरिक वरखडे मामा, साई सेवा अर्बन संस्थेचे चेअरमन प्रदीप येवले,
विलास मुसमाडे, देवळाली प्रवरा नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष सुखदेव मुसमाडे, ज्येष्ठ नेते मच्छिंद्र पाटील शिंदे, श्रीरामपूर जिल्हा कृती समिती चे लांडगे साहेब, पाटबंधारे विभागाचे जिल्हा उप अभियंता अविनाशजी आव्हाड साहेब,
देवळाली प्रवरा येथील उप अभियंता थोरे साहेब, इन्स्पेक्टर सिनारे साहेब आदींसह काकडे कदम, वरखडे नालकर, सांबारे वाडकर या तीनही पादचारी फुलांचे लाभधारक शेतकरी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रसंगी बोलताना अभिजीत दादा पोटे पुढे म्हणाले की, प्रहारने तीन पादचारी पुल देऊन देवळालीकरांची मने जोडली आहेत. दसऱ्या निमित्त आ. बच्चू कडू यांनी देवळालीकरांना ही एक अनोखी भेट दिली असून माझे हस्ते 30 लक्ष रुपये खर्चाच्या पादचारी पुलाचे उद्घाटन संपन्न झाले असल्याचे या निमित्ताने मी जाहीर करतो
50 वर्षापासून प्रलंबित असणारे पादचारी पुल प्रहार ने तीन महिन्यात मंजूर करून काम पूर्ण केले. घंटो का काम मिंटोमे अशी प्रहार ची काम करण्याची पद्धत आहे.
यापुढेही देवळालीच्या विकासासाठी प्रहारला साथ द्या व श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ क्षेत्राचे अध्यक्ष आप्पासाहेब ढूस यांचे पाठीशी ताकदीने उभे राहून त्यांना साथ द्या. म्हणजे देवळालीत कोणताही प्रश्न शिल्लक राहणार नाही.
तसेच देवळाली प्रवरा परिसरात प्रहार ने मिळून दिलेले पुल पूर्ण झाल्यावर परिसरातील माता भगिनींना, वृद्धांना अश्रू अनावर झाले. याचा अर्थ समाजाच्या प्रश्नांची जान प्रहारला असून कामाद्वारे आम्ही जनतेची मने जिंकली हेच यातून स्पष्ट होते.
प्रसंगी माजी सनदी अधिकारी दत्ता कडू पाटील, प्रहार जिल्हा संघटक बाळासाहेब खर्जुले, शेतकरी प्रतिनिधी, पाटबंधारे विभागाचे जिल्हा उप अभियंता अविनाशजी आव्हाड साहेब आदींची या प्रसंगी भाषणे झाली.
श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ क्षेत्राचे अध्यक्ष आप्पासाहेब ढूस यांच्या प्रयत्नाला यश आल्या बद्दल त्यांचे व त्यांना विशेष सहकार्य लाभलेले गणेश नानोर, कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग,
प्रकाश थोरात, कार्यकारी अभियंता यांत्रिकी विभाग अहमदनगर पाटबंधारे विभाग, अविनाश आव्हाड, उपअभियंता यांत्रिकी विभाग अहमदनगर, थोरे साहेब, उप अभियंता देवळाली प्रवरा पाटबंधारे विभाग, सिनारे साहेब उपअभियंता पाटबंधारे विभाग देवळाली प्रवरा यांचे या पुलांसाठी विशेष सहकार्य लाभले त्याबद्दल वाडकर सांबरे वस्ती येथील नागरिकांनी त्यांचे हार्दिक आभार व्यक्त केले.
श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ क्षेत्राचे अध्यक्ष आप्पासाहेब ढूस यांनी प्रास्ताविक केले तर प्रहार चे प्रसिद्धीप्रमुख राजेश मंचरे यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.
0 Comments