नांदेड (देगलूर) - पॉवर ऑफ कॉन्फिडन्स अकॅडमी चे संचालक प्रा.मुबिनसर हे अत्यंत गरीब परिस्थिती वर आत्मविश्वासाने मात करत आपले शिक्षण पूर्ण करत व तसेच विद्यार्थी प्रिय शिक्षक, हाडाचे शिक्षक म्हणून ही सरांना ओळखले जाते
यांच्या भाषण या कलेने ते सर्वांच्या मनावर राज्य करणारे कमी वयात प्रभावी, प्रेरणादायी वक्ते बनत चालले आहेत
वक्तृत्व क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल व तसेच समाजउपयोगी क्षेत्रात दहा विद्यार्थ्यांना मोफत हिंदी व मराठी चे वर्षभर फ्री कोचिंग देण्याचे काम व तसेच कोरोना काळात ज्यांचे पालक नाहीत अशा दहावी व बारावीच्या एकूण वीस विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण दिले व तसेच बीओ ऑफिस द्वारे मुबिन सर यांची निवड साधन व्यक्ती म्हणून करण्यात आली होती
देगलूर व नायगाव येथील संयुक्त पद्धतीने 2017 मध्ये एकूण 100 शिक्षकांना हिंदी विषयाचे 6 तासाचे प्रभावी प्रशिक्षण मुबिन सरांद्वारे देण्यात आले.
आता पर्यत बऱ्याच ठिकाणी विविध जयंती व पुण्यतिथी निमित्त प्रमुख वक्ता म्हणून मुबिन सरांनी आपली हजेरी लावली आहे.
शाळा महाविद्यालय येथे सरांना विदयार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी व त्यांना मार्गदर्शन साठी वक्ता म्हणून ही बोलवण्यात येते, शिव जयंती निमित्त सरांचे विविध ठिकाणी शिवव्याख्याते म्हणून ही ओळख आहे,सरांनी आपल्या भाषणाच्या अकॅडमी द्वारे आता पर्यंत 200 ते 300 वक्ते घडविले आहेत.
सरांच्या अकॅडमीत नर्सरी ते 70 वर्षापर्यंत चे सर्वच लोकं प्रशिक्षण घेतात सर फक्त 1 महिण्यात त्यांना भाषण करायला परिपूर्ण तयार करून सोडतात. सरांच्या अकॅडमी ला उदगीर, मुखेड अश्या विविध बाहेरगावी लोकांनी हजेरी लावलेली आहे.
सरांच्या अकॅडमीत राजकीय, सामाजिक, उद्योगिक, शैक्षणिक अश्या सर्वच क्षेत्रातील लोकांनी सुद्धा प्रशिक्षण घेतले आहे व विशेष म्हणजे पी.एच.डी धारक विद्यार्थी यांनी सुद्धा सरांच्या अकॅडमी ला हजेरी लावली आहे.
महात्मा ज्योतीराव फुले शिक्षक परिषद,महाराष्ट्र आयोजित
12 वी राज्यस्तरीय शिक्षण परिषद व पुरस्कार सोहळा
३०ऑक्टोबर २०२२ रविवार स.९.३० वा.सहकार महर्षी शामराव पाटील यड्रावकर नाट्यगृह, जयसिंगपूर जि.कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमात प्रा.मुबिन सर संचालक पॉवर ऑफ कॉन्फिडन्स अकॅडमी,देगलूर यांना "राष्ट्रीय वक्तृत्व रत्न पुरस्कार" देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमचे उदघाटक छत्रपती संभाजी राजे (मा.खासदार तथा अध्यक्ष स्वराज्य संघटना) या कार्यक्रमचे अध्यक्ष.भूषणसिंहजी राजे(होळकर इंदौर अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज)मार्गदर्शक मा.खा.धैर्यशील माने(लोकसभा सदस्य),मुख्य अतिथी मा.आ.डॉ.राजेंद्र पाटील (शिरोळ विधानसभा जि.कोल्हापूर),विशेष अतिथी ऍड.गजानन कदम (सुप्रसिद्ध वकील उच्च न्यायलय,मुंबई), आदी मान्यवर मोठया संख्येत उपस्थित होते.
राष्ट्रीय वक्तृत्व रत्न पुरस्कार हा पुरस्कार मुबिन सरांना श्रीमंत भूषणसिंहजी राजे यांच्या हस्ते देण्यात आला
हा पुरस्कार घेताना घेताना प्रा.मुबिन सरांचे हितचिंतक व सर्व जिवलग मित्र परिवार प्रतिनिधी स्वरूपात ही उपस्थित होते
या मध्ये मारोती मोटरगेकर काकाश्री, शेख.सलीम, डॉ.विरेश लिंगम, किशोर अमृतवार, बालाजी बोडके व तसेच गुरुवर्य प्रा.खंडगावे, मारोती गायकवाड, श्रीरामे आदी सर्व उपस्थित होते.
सर्व हितचिंतक वर्गाकडून मुबिन सरांवर सत्कार व शुभेच्छांचा वर्षाव होतं आहे तसेच त्यांना पुढील वाटचाली साठी आशीर्वाद ही दिले जात आहे.
0 Comments