राहुरी फॅक्टरी - दि. २/११/२२ गोपालष्टमीच्या शुभ मुहूर्तावर राहुरी फॅक्टरी येथील गोपाल कृष्ण गोशाळेचा वर्धापन दिन अतिशय उत्साहाने व आनंदात साजरा करण्यात आला
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीरामपूर चे सामाजिक कार्यकर्ते भगवान शेठ कुंकू लोळ होते यावेळी गोमातेची विधिवत पूजा करण्यात आली.
प्रसंगी निलेश भाऊ तनपुरे, प्रवीण भाऊ सिंगी, प्रशांत भाऊ सुराणा, गिरीश भाऊ सुराणा, आबासाहेब कोळसे, प्रेमचंद कुंकूलोळ, कल्याण शेठ कुंकूलोल, राष्ट्रिय जल पुरस्कार प्राप्त पत्रकार शिवाजी घाडगे, माजी सनदी अधिकारी दत्ता कडू पाटील, दत्ताभाऊ मुसमाडे, विजय विजन, पत्रकार आशिष संसारे, दिलीप धीवर, जालिंदर भाऊ कोहकडे, डॉ. हर्षद चोरडिया, गोषाळेचे संचालक ललित चोरडिया, श्वेता विजन, भारती चोरडिया, डॉ प्राची चोरडिया, राहुरी येथील राजस्थानी ग्रुप, आदी गोप्रेमी उपस्थित होते.
प्रसंगी सर्व मान्यवरांचा सत्कार गोशाळेच्या वतीने करण्यात आला. यावेळी आरोग्य सेविका कुमारी मीनाक्षी त्रिभुवन हिचा वाढदिवस साजरा करण्यात आला व गाईंचा संभाळ करणारे बाळासाहेब नेमाने यांचा देखील पोशाख देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी गोसेवक ललित चोरडिया यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यांनी उपस्थितांना विनंती केली की, बारा वर्षापासून मी हे काम करीत आहे इथून पुढे नवीन तरुणांनी विशेषता निलेश भाऊ, प्रवीण भाऊ यांनी पुढे यावे त्यांना सर्वतोपरी मी मदत करील शिवाजी घाडगे पत्रकार यांनी आपल्या भाषणात बऱ्याच जुन्या गोष्टीची आठवण करून पाण्याचा योग्य वापर करावा अशा सूचना दिल्या,
दत्ताभाऊ कडू यांनी गोशाळेच्या सर्व अडचणी सोडवण्यासाठी मदत करणार असे जाहीर केले, यावेळेस दत्ताभाऊ मुसमाडे यांनी उपस्थित दात्यांना दानपेटी दुकानात ठेवून सहकार्य करण्याची आव्हान केले ललितसेठ चोरडिया यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले.
0 Comments