खबरे हर पल सच का सामना हम करते है लोकतंत्र से सच्ची पत्रकारिता से

W3Schools

राहुरी फॅक्टरी डी पॉल इंग्लिश स्कूलच्या शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन; प्राचार्यांनी मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन घेण्यात आले मागे

अहमदनगर - राहुरी फॅक्टरी येथील डि पाॅल इंग्लिश मीडियम स्कूल मधील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी थकीत वेतन व इतर मागण्यांसाठी गुरुवार दिनांक २४ नोव्हेंबर रोजी सकाळी काम बंद आंदोलन सुरू केले.

यावेळी डिपॉल स्कुलचे प्राचार्य फादर सॅन्टो यांनी शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या मागण्या लवकरात लवकर मान्य करू असे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
राहुरी फॅक्टरी येथे डि पाॅल इंग्लिश मीडियम स्कूल येथे अनेक शिक्षकेतर कर्मचारी हे गेल्या २० ते २५ वर्षांपासून तुटपुंज्या पगारावर काम करीत आहेत. 

गेल्या दोन वर्षांपासून या शाळेतील शाळा व्यवस्थापनाकडून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर अन्याय होत असून त्यांना पगार मिळत नाहीत. शाळा व्यवस्थापनाच्या मनमानी कारभाराला वैतागून कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन करून प्रवेशद्वारावर ठिय्या पुकारला होता. तसेच या शाळेमध्ये शाळा सुटल्यानंतर वंदे मातरम होत नाही. अशी अनेक पालकांची तक्रार ही आहे.

या आंदोलनामुळे शाळेच्या व्यवस्थापनाची एकच धांदल उडाली.डी.पॉल स्कुलचे प्राचार्य सॅन्टो यांनी आंदोलकांशी चर्चा करून येत्या काही दिवसात वेतन व इतर प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.

दरम्यान आमच्या मागण्या येत्या ३० तारखेपर्यंत पूर्ण न केल्यास आणखी तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडु असा इशारा आंदोलकांच्या वतीने तात्याराम गीते यांनी दिला आहे.

या आंदोलनात तात्याराम गिते, सुनील पठारे, शिवाजी अंगरखे, ऋषी नवले, बाळासाहेब विधाटे, आबासाहेब वदक, आबासाहेब पेरणे, गणेश आढाव, संजय कदम, किरण पंडित, मनोज जाधव, गजानन गाढे, भास्कर म्हस्के, किरण गायके, भारत गोसावी, सचिन जगताप, छोटू माळवी, सागर पाळंदे, प्रकाश शेटे, अण्णा पंडित, सागर कुदनर, संजय भंडारे, विजय महाडीक, राजू गायगाये आदी सहभागी झाले होते. तसेच पालकांनीही या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे.

Post a Comment

0 Comments

पत्रकारिता के लिए सहायता करें

Follow on Dailyhunt

W3Schools

Contact Form

Name

Email *

Message *

W3Schools