खबरे हर पल सच का सामना हम करते है लोकतंत्र से सच्ची पत्रकारिता से

W3Schools

एक अनोखी दशविधी क्रिया नगर मनमाड रस्ता दुरुस्तीसाठी राहुरी सूतगिरणी जवळ प्रशासनाचाच दशविधी क्रिया

नगर मनमाड महामार्ग दुरुस्तीसाठी एक अनोखे आंदोलन

एक अनोखी दशविधी क्रिया नगर मनमाड रस्ता दुरुस्तीसाठी राहुरी सूतगिरणी जवळ प्रशासनाचाच दशविधी क्रिया

अहमदनगर - आठ दिवसात एकाच ठिकाणी सहा निष्पाप नागरिकांचा जीव गमावा लागला याच्या निषेधार्थ आज राहुरी सूतगिरण येथे एक अनोखे आंदोलन करण्यात आले 
त्यामध्ये प्रशासनाचा अनोखा दशविधी क्रिया करून निषेध करण्यात आला नगर मनमाड महामार्गाचे काम अनेक वर्षापासून रखडले आहे 
यामध्ये गेल्या एक वर्षापासून शेकडो नागरिकांचे रस्ता अपघातात आपले प्राण गमावे लागले आहे यामध्ये लहान मुलाचा समावेश आहे राहुरी ते राहुरी कारखाना दरम्यान हॉटेल आकाश पासून ते गुंजाळ नाका एकतर्फे वाहतूक चालू आहे यामध्ये आठवड्यात सहा निष्पाप लोकांना आपला जीव गमावा लागला आहे तरी पण गेंड्याचे कातडे असलेले प्रशासनाला जाग आली नाही म्हणून हे अनोखे आंदोलन करण्यात आले आहे 
नगर मनमाड राज्य महामार्गाची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. आज पर्यंत राहुरी तालूका हद्दीत रस्ता अपघातात शेकडो जणांचा बळी गेला आहे. याबाबत आता विविध संघटनांच्या वतीने तीन डिसेंबर रोजी नगर मनमाड राज्य महामार्गावर प्रशासनाचा दहाव्या च्या विधीचे आयोजन करण्यात आले

नगर मनमाड रस्त्याची दुरावस्ता होऊन अनेक कुटुंब उध्वस्त झालेत. अपघातांची मालीका सुरूच असून आतापर्यंत शेकडो जणांचा बळी गेला आहे. तर अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे. याबाबत सरकार अजुनही गंभीर नाही.
रस्त्यावर झालेल्या अपघातात मृत पावलेल्या नागरीकांच्या स्मरणार्थ व प्रशासनाच्या निषेधार्थ शनिवार दिनांक ३ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ठिक ९ वा. राहुरी तालूका हद्दीतील नगर मनमाड रोड, सूतगिरणी जवळ दशक्रिया विधी घालून सरकारचा निषेध नोंदविण्यात आला आहे
ज्यांना खरंच वाटत की, हा मरणाकडे घेवून जाणारा रस्ता दुरुस्त व्हावा, अजून कुणाचा बळी या रस्त्यावर जावू नये, कुणाचे लेकरं अनाथ होऊ नये. तर या दशक्रिया विधीला हजर राहण्याचे आवाहन नगर मनमाड रस्ता दुरूस्ती कृती समितीच्यावतीने करण्यात आले.

यावेळी नगर मनमाड रस्ता दुरुस्ती कृती समितीचे वसंत कदम देवेंद्र लांबे वंचित चे साईनाथ बोर्डे शांती चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष दीपक त्रिभुवन, अजित येवले, व्यापारी असोसिएशनचे सुनील विश्वासराव राजळे यांना व विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments

पत्रकारिता के लिए सहायता करें

Follow on Dailyhunt

W3Schools

Contact Form

Name

Email *

Message *

W3Schools