कळंब - विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या २९ व्या नामविस्तार दिनाच्या निमित्ताने स्मारक समितीच्या वतीने शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून नामविस्तार लढ्यात हौतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
याप्रसंगी स्मारक समितीचे विश्वस्त माजी नगरसेवक सुनिल गायकवाड, शिलवंत बप्पा, रिपब्लिकन सेनेचे जिल्हाप्रमुख अनिल हजारे, लोकजन शक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ गायकवाड, आर पी आयचे तालुकाध्यक्ष शिवाजी सिरसट, भाजपचे सतपाल बनसोडे, भारतीय बौद्ध महासभेचे शहराध्यक्ष सी.आर.घाडगे, ज्येष्ठ साहित्यिक रमेश बोर्डेकर, राजाराम वाघमारे, कैलास जावळे, माणिक गायकवाड, प्रमोद ताटे, सुमित रणदिवे, सूर्यकांत ढवळे, नागेश धिरे, दिलीप कसबे, भारत कदम आदींची उपस्थिती होती..
0 Comments