अहमदनगर - राहुरी येथे दिनांक 9 जानेवारी हा दिवस इंडियन ऑइल ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो. इंडियन ऑइल कंपनीचे अधिकारी श्री मधुरेंद्र पांडे व श्री सागर राहींज यांनी राहुरी येथील इंडियन ऑइल चे अधिकृत डीलर श्री सचिन भुजाडी यांच्या सूर्या पेट्रोल पंप येथे इंडियन ऑइल ग्राहक दिन साजरा करण्यात आला.
यावेळी ग्राहकांना गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. ग्राहकांच्या हस्ते केक कापून इंडियन ऑइल ग्राहक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सर्व ग्राहकांना मिठाई व केक देण्यात आला.
कंपनी अधिकारी व पंप मालक यांनी ग्राहकाशी हितगुज साधून आपल्या सेवेबद्दल जाणून घेतले. ग्राहकांच्या चेहऱ्यावरील समाधान आणि आनंद पाहून कंपनी अधिकारी व मालक सुखावले. तसेच अधिकारी यांनी कर्मचाऱ्यांबरोबर संवाद साधला. सूर्या पेट्रोल पंपाच्या कर्मचाऱ्यांकडून ग्राहकांना देण्यात येणाऱ्या तत्पर सेवेबद्दल अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी इंडियन ऑइल चे डीलर श्री सचिन लांगोरे. महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी प्रमोद काळपुंड सूर्या पेट्रोल पंपाचे मॅनेजर प्रशांत खराडे व श्रीकांत माळवदे तसेच ग्राहक व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी पंप मालक श्री सचिन भुजाडी म्हणाले मी इंडियन ऑइल ग्राहक दिनानिमित्त सर्व ग्राहकांना शुभेच्छा देतो व आभार मानतो.
0 Comments