अहमदनगर / देवळाली प्रवरा -दि. ३० जाने.२३
पक्षविरोधी कार्यवाही केल्याने प्रहार जनशक्ती पक्षाचे देवळाली प्रवरा शहराध्यक्ष विजय बाळासाहेब कुमावत यांची पक्षाचे जिल्हाध्यक्ष अभिजीत दादा पोटे यांचे आदेशाने आज निलंबन करण्यात आले.
जिल्हा अध्यक्ष अभिजीत दादा पोटे यांचे आदेशान्वये प्रहार जनशक्ती पक्षाचे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष अप्पासाहेब ढूस यांनी काढलेल्या निलंबन आदेशात म्हटले आहे की, दि. ३० जानेवारी २०२३ रोजी होत असलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये पक्षविरोधी कार्यवाही केल्याचे निदर्शनास आलेने पक्षाचे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष अभिजीत दादा पोटे यांनी दिलेल्या आदेशान्वये प्रहार जनशक्ती पक्षाचे देवळाली प्रवरा शहर अध्यक्ष विजय बाळासाहेब कुमावत यांना पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्व पदावरून निलंबित करण्यात आले आहे.
निलंबन आदेशात पुढे असेही म्हटले आहे की, विजय कुमावत यांचे प्राथमिक सदस्यत्व पदावरून निलंबन झाल्याने त्यांचे देवळाली प्रवरा शहराध्यक्ष पद रिक्त झाले आहे. त्यामुळे त्यांनी त्यांच्याकडे असलेले पक्षाचे प्रमाणपत्र, फॉर्म, बॅच आदी सर्व साहित्य तात्काळ देवळाली प्रवरा येथील प्रहार कार्यालयात जमा करावयाचे आहे. तसेच येथून पुढे प्रहार नावाने कोणतेही काम त्यांनी करावयाचे नसून प्रहार नावाचा व साहित्याचा त्यांनी वापर केल्याचे निदर्शनास आल्यास त्यांचे वर पक्ष नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येईल.
आमचे प्रतिनिधीशी बोलताना आप्पासाहेब ढूस यांनी म्हटले आहे की, जिल्हाध्यक्ष यांचे सूचनेवरून उपरोक्त कारवाई करण्यात आली असून श्री कुमावत हे यापूर्वी वारंवार पक्षाच्या कार्यक्रमांना गैरहजर राहणे, तसेच पक्षाच्या ध्येय धोरणाप्रमाणे सुरू असलेल्या कामांमध्ये सहभाग न घेणे आदी त्यांच्या वारंवार होणाऱ्या चुकांकडे आज पावतो पक्षाने दुर्लक्ष केले होते. परंतु आज या निवडणूक कार्यक्रमामध्ये त्यांच्याकडून पक्षविरोधी कार्यवाही केल्याचे निदर्शनास आल्याने जिल्हाध्यक्ष यांनी कुमावत यांच्या निलंबनाचे आदेश देण्यासाठी आम्हास आदेश दिल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
पुढे बोलताना ढूस म्हणाले की, पक्षाच्या विचारांशी व ध्येयधोरणांशी कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही. पक्षाचे नावाला कलंक लागेल अशा पद्धतीचे काम कोणी करत असल्यास त्याची गय केली जाणार नाही.
कुमावत यांच्या निलंबनाने देवळाली प्रवरा शहराध्यक्ष पद रिक्त झाल्याने नवीन शहराध्यक्ष पदासाठी आज सायंकाळी सहा वाजता देवळाली प्रवरा येथील प्रहार कार्यालयात पक्षाच्या कार्यकर्त्यांची तातडीची बैठक बोलावली असून त्यामध्ये पुढील शहराध्यक्षांची सर्वांनुमते निवड करण्यात येईल असे ढूस यांनी सांगितले.
0 Comments