कळंब -विद्यार्थ्यांनी आयटीआयचे शिक्षण घेऊन कौशल्य आत्मसात करून छोटे छोटे उद्योग निर्माण करून स्वंय रोजगाराची निर्मिती करावी व स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे आवाहन मंगेश चिवटे यांनी केले. ते धनेश्वरी शैक्षणिक संकुलाच्या कळंब शाखेत बोलत होते.
डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भैरवनाथ अध्यापक विद्यालय व भैरवनाथ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत दि.१० जानेवारी २०२३ रोजी मुख्यमंत्री यांचे स्विय सहाय्यक व राज्याचे वैद्यकीय मदत सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी सदिच्छा भेट दिली.
पुढे बोलताना चिवटे म्हणाले की,विद्यार्थ्यांनी कोणत्याही क्षेत्रात लाज न बाळगता आपल्या कौशल्य व बुद्धीच्या जोरावर प्रगती करावी व वैद्यकीय क्षेत्रात कोणालाही कसलीही अडचण आली असता त्यांनी संपर्क साधून आरोग्य विषयक सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य सतिश मातने यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना त्यांची ओळख देखील करून दिली.
यावेळी उद्योजक चेतन कात्रे, भैरवनाथ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य सुरज भांडे, प्रा.श्रीकांत पवार, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.अविनाश घोडके, प्रा.मोहिनी शिंदे-चोंदे, निदेशक सागर पालके, निदेशक अविनाश म्हेत्रे, निदेशक विनोद जाधव, अतिश वाघमारे, विनोद कसबे आदी उपस्थित होते.
0 Comments