कळंब ( उस्मानाबाद धाराशिव) - जय भीम प्रतिष्ठानच्या वतीने विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्त उत्सव समिती व पदाधिकारी यांची निवड करण्यात आली.
दिनांक 26 वार रविवार रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त उस्मानाबाद शहरातील त्रिशरण चौक, भिम नगर या ठिकाणी आयोजित केलेल्या बैठकीमध्ये जय भीम प्रतिष्ठानचे भैय्यासाहेब नागटिळे व गोपी शेठ बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
यावेळी जयंती उत्सव समिती कार्यकारणी यांची निवड करण्यात आली यामध्ये अध्यक्ष म्हणून आकाश शहाजी बनसोडे तर उपाध्यक्ष म्हणून आकाश युवराज साबळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली .
तर सहसचिव विलास छगन गंगावणे कोषाध्यक्ष विवेक झुंबर जाधव तर मिरवणूक प्रमुख म्हणून मोन्या बोकेफोडे, मयूर बनसोडे, बंटी बनसोडे, अभिजीत जानराव ,राहुल गंगावणे, पवन पौळ, शरद माने विकी वाघमारे, दत्ता सोनवणे, रवी गायकवाड, यांची कार्यकारणी पदी निवड करण्यात आली आहे.
प्रतिनिधी - अमोल रणदिवे
0 Comments