कळंब : श्री.संत गुरु रविदास महाराज यांची 646 वी जयंती संत गुरु रविदास महाराज मंदिर विद्यानगरी कळंब येथे शुक्रवार दिनांक 17 फेब्रुवारी 2023 रोजी मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. सकाळी 9.18 वाजता ह. भ. प. ज्ञानेश्वर माऊली पाखरे महाराज आपेगावकर यांच्या शुभहस्ते मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व प्रवचन होईल. यावेळी प्रमुख उपस्थिती मा. नगराध्यक्ष संजय मुंदडा व मा. नगराध्यक्ष सुवर्णा मुंडे हे असतील.
दुपारी 12.15 वाजता राष्ट्रीय चर्मकार महासंघ कळंब तालुका यांनी संत रविदास जयंती उत्सव व चर्मकार समाज मेळाव्याचे आयोजन केलेले आहे. त्याचबरोबर या ठिकाणी विविध क्षेत्रातील गुणवंतांचा व विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळादेखील आयोजित केला आहे.
या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष श्री. बबनरावजी घोलप त्याचप्रमाणे उद्घाटक म्हणून श्री. राणाजगजितसिंह पाटील, प्रमुख पाहुणे म्हणून उस्मानाबाद लोकसभेचे खासदार ओमप्रकाशराजे निंबाळकर, आमदार ज्ञानराज चौगुले, आमदार कैलास पाटील, आमदार प्रणिती शिंदे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्री. धनंजय सावंत, धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष प्रतापसिंह पाटील, चर्मकार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष माधवराव गायकवाड, माजी आमदार संगीताताई ठोंबरे, भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे, ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळा सचिव अशोकराव मोहेकर व राजेंद्रजी शेरखाने मुख्य संघटक जिल्हा काँग्रेस उस्मानाबाद यांच्यासह इतर मान्यवर व संघटनेचे विविध पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तरी या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने समाजबांधव व मित्रपरिवार यांनी उपस्थित राहावे असे आवाहन युवक जिल्हाध्यक्ष श्री. विकास कदम यांनी केले आहे.
0 Comments