कळंब - थोर समाजसुधारक,बंजारा समाजाचे आराध्य दैवत श्री संत सेवालाल महाराज यांच्या २८४ व्या जयंतीनिमित्त डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कळंब शहरातील वेद शैक्षणिक संकुल अंतर्गत भैरवनाथ अध्यापक व भैरवनाथ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वर्कशॉपमध्ये दि.१५ फेब्रुवारी २०२३ रोजी श्री संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस प्राचार्य सुरज भांडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यानंतर विद्यार्थ्यांना सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.अविनाश घोडके यांनी श्री.संत सेवालाल महाराज यांच्या विषयी माहिती सांगितली.
या प्रसंगी प्रा.मोहिनी शिंदे-चोंदे, निदेशक सागर पालके, निदेशक विनोद जाधव, विनोद कसबे, विद्यार्थी-विद्यार्थ्यांनीची उपस्थिती होती.
कळंब प्रतिनिधी -अमोल रणदिवे
0 Comments