कळंब - राष्ट्रीय चर्मकार महासंघ कळंब तालुका आयोजित श्री. संत गुरु रविदास महाराज जयंती, विविध क्षेत्रातील गुणवंतांचा गुणगौरव सोहळा, चर्मकार समाज मेळावा व संत रविदासांची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा मोठ्या उत्साहात करण्यात आली.
श्री. संत गुरु रविदास महाराज मंदिर विद्यानगरी कळंब येथे सकाळी 9.18 वाजता श्री. संत गुरु रविदास महाराज यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा वे. मु. श्री. योगेश गुरुजी पारेकर यांच्या उपस्थितीत ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली पाखरे महाराज आपेगावकर यांच्या शुभहस्ते करण्यात आली. त्यानंतर पाखरे महाराजांच्या प्रवचनाचा कार्यक्रम झाला.
दुपारी 12.15 वाजता श्री. संत गुरु रविदास महाराज यांची 646 वी जयंती व विविध क्षेत्रातील गुणवंतांचा गुणगौरव सोहळा पार पडला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन तुळजापूर विधानसभेचे आमदार मा. राणाजगजीतसिंह पाटील यांनी केले. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष मा. माधवराव गायकवाड होते.
प्रमुख पाहुणे म्हणून धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील, माजी आमदार मा. संगीता ठोंबरे, भाजपा जिल्हाध्यक्ष मा.नितीन काळे, उस्मानाबाद जिल्हा काँग्रेस मुख्य संघटक मा. राजेंद्र शेरखाने, भाजपा तालुकाध्यक्ष मा. अजित पिंगळे, शिवसेना तालुकाध्यक्ष मा.लक्ष्मीकांत हुलजुते, काँग्रेस आय तालुकाध्यक्ष मा. पांडुरंग कुंभार, सोलापूर महानगरपालिका नगरसेविका मा. संगीता जाधव, प्रा. मीनाक्षी भवर यांच्यासह संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मा. सी. के. मुरळीकर, प्रदेशाध्यक्ष मा.संजय शिंदे, युवक प्रदेशाध्यक्ष मा. नितीन शेरखाने, मराठवाडा उपाध्यक्ष मा. एन. डी. शिंदे, मराठवाडा कार्याध्यक्ष मा. बबन वाघमारे, उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष गणपती कांबळे, बीड जिल्हाध्यक्ष नानासाहेब घोडके, लातूर जिल्हाध्यक्ष मा. रवी कुरील, मराठवाडा संघटक मा. नरहरी सोनवणे, लातूर उपजिल्हाध्यक्ष मा. राज साबळे या मान्यवरांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाची प्रस्तावना राष्ट्रीय चर्मकार महासंघ उस्मानाबाद युवक जिल्हाध्यक्ष श्री. विकास कदम यांनी केली. ते म्हणाले की , सर्व समाज बांधवांच्या सहकार्याने श्री संत गुरु रविदास महाराजांचे मंदिर अगदी अल्पशा काळातच उभारण्यात आले. यापुढे सामाजिक कार्यक्रम राबवण्यासाठी सभामंडपाची आवश्यकता आहे.
त्यानंतर उद्घाटनपर भाषण तुळजापूर विधानसभेचे आमदार मा. राणाजगजीत सिंह पाटील यांनी केले. व यापुढे चर्मकार समाजाच्या प्रगतीसाठी व अडीअडचणीत कायम सोबत राहण्याचा शब्द दिला.
त्याचप्रमाणे चर्मकार समाजातील तरुण पिढीला उद्योग उभारण्यासाठी प्रोत्साहित करत उद्योग शिबिर राबवण्याचा व सभा मंडपासाठी निधी उपलब्ध करून देण्याचा शब्द दिला.
यानंतर विविध क्षेत्रातील गुणवंतांचा गुणगौरव सोहळा पार पडला. यामध्ये युवा उद्योजक श्री. राहुल गवळी, युवा उद्योजक श्री. रमाकांत लोहकरे, आदर्श शिक्षक श्री. बाबासाहेब कांबळे, डॉ.रोहिणी कदम, डॉ. बालाजी वाघमारे, डॉ. रुपेश मानेकर, आरोग्यदूत गजानन साबळे, नगरसेविका संगीता जाधव, उद्योजक रमेश बनसोडे यांच्यासह गुणवंत विद्यार्थी अक्षरा सुरवसे, तन्मय कदम, समर्थ कदम, संस्कृती शेवाळे, वैष्णवी शिंदे यांचा गुणगौरव सोहळा पार पडला.
त्यानंतर धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील, माजी आमदार मा. संगीता ठोंबरे,उस्मानाबाद जिल्हा काँग्रेस मुख्य संघटक मा. राजेंद्र शेरखाने, काँग्रेस आय तालुकाध्यक्ष मा. पांडुरंग कुंभार, सोलापूर महानगरपालिका नगरसेविका मा. संगीता जाधव, प्रा. मीनाक्षी भवर, राष्ट्रीय उपाध्यक्ष मा. सी. के. मुरळीकर,युवक प्रदेशाध्यक्ष मा. नितीन शेरखाने, मराठवाडा उपाध्यक्ष मा. एन. डी. शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष मा. माधवराव गायकवाड यांनी श्री. संत गुरु रविदास महाराज यांचे विचार आत्मसात करून समाजाने आपला विकास करावा असे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. काकासाहेब मुंडे तर आभार प्रदर्शन श्री. बाबासाहेब कांबळे यांनी केले.
हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी रंगनाथ कदम, प्रा. जालिंदर लोहकरे, प्रा. मधुकर माने,रूपचंद लोहकरे, बाबासाहेब कांबळे, संपत शिंदे, महादेव ठोंबरे, बाबुराव पाखरे, श्रीहरी ताटे, लिंबराज ठोंबरे, परमेश्वर कदम, अशोक लाड, संगीत पाखरे, भिकचंद शेवाळे, बालाजी साबळे, हनुमंत कांबळे, इ पदाधिकारी यांनी मेहनत घेतली. यावेळी मोठ्या संख्येने चर्मकार समाज बांधव व भगिनी उपस्थित होत्या.
चौकट- सभागृहासाठी 15 लाख निधी देणार - मा.आमदार राणाजगजितसिंह पाटील
श्री. संत गुरु रविदास महाराज मंदिर येथे लवकरच सभागृहासाठी रुपये 15 लाख निधी उपलब्ध करून देणार असल्याचे आपल्या मनोगतात तुळजापूर विधानसभेचे आमदार मा. राणाजगजितसिंगसिंह पाटील यांनी सांगितले.
प्रतिनिधी - अमोल रणदिवे
0 Comments