इटकूर प्रशाला ही सातारा सैनिक स्कूल परीक्षेची तयारी करणारी कळंब तालुक्यातील एकमेव जिल्हा परिषद शाळा
दि. 08/01/2023 रोजी घेण्यात आलेल्या सातारा सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेत इटकूर प्रशालेतील इयत्ता 5 वीतील 9 पैकी 8 विद्यार्थी पात्र झाले आहेत.
इयत्ता सहावी वर्गासाठी भारतीय संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारित असलेल्या सातारा सैनिक स्कूल मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी NTA मार्फत अत्यंत अवघड अशी प्रवेश परीक्षा घेतली जाते. त्यात प्रशाला इटकूरचे 9 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी 8 विद्यार्थी लेखी परीक्षेत पात्र झाले आहेत. ही अभिमानास्पद बाब आहे.
पात्र विद्यार्थी खालीलप्रमाणे :
1. समर्थ किरण मिटकरी - 200 गुण
2. रिया विकास कोठावळे - 182 गुण
3. सिद्धी रामलिंग कानडे - 175 गुण
4. संस्कृती अर्जुन भारती - 161 गुण
5. चैतन्य उद्धव गंभीरे - 169 गुण
6. जयराज सुहास करंजकर - 158 गुण
7. सिद्धी महादेव पावले - 154 गुण
8. स्वराली सुधीर वाघमारे - 143 गुण
वरील विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी होऊन पुढील प्रवेशाबाबत दिशा समजणार आहे.
प्रशालेच्या आतापर्यंतच्या निकालामधील सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेतील हे यश प्रशालेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा ठरला आहे.
या विद्यार्थ्यांना प्रशालेतील शिक्षक अनिल क्षिरसागर व अंजली यादव मार्गदर्शन लाभले..
या यशाबद्दल ग्रामस्थ, तालुका प्रशासन, शाळा व्यवस्थापन समिती अशा स्तरावर यशवंत विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे कौतुक होत आहे.
प्रतिनिधी - अमोल रणदिवे
0 Comments