अहमदनगर - देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या भूमिगत गटार योजनेच्या कामावर काम करणाऱ्या निरपराध कामगाराचा ठेकेदाराच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळे आज बळी गेला आहे. ठेकेदाराने कामगारांच्या सुरक्षेची काळजी घेतली नसल्याचेच या घटनेतून दिसते.
त्यामुळेच हा कामगार जवळ्पास १५ फूट खोल मातीत गाडला गेला. त्यामुळे भूमिगत गटार कामाच्या ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी प्रहार चे वतीने आम्ही मागणी करतो.
जवळपास ५० कोटी रुपये खर्चाच्या या भूमिगत गटार योजनेत विकासाच्या नावाखाली टक्के वारीसाठी घाई घाई ने देवळाली प्रवरा शहरातील सर्व चांगले रस्ते फोडून ठेवले असून त्यामुळे नागरिकांना शहरातून पाई चालणे सुध्दा मुश्किल झाले आहे.
भूमिगत गटार कामाच्या या खोदाईमुळे देवळाली मधील कित्येक नागरीक पडून जखमी झाले आहेत. तसेच नागरिकांच्या वाहनांचे नुकसान झाले आहे.
शहरातील दळणवळण व्यवस्था या गटारगंगेणे पूर्णतः विस्कळीत झाली आहे. देवळाली प्रवरा शहराचे वैभव या गटारीत शेवटच्या घटका मोजत असताना आज या गटार गंगेने या मयत कामगाराच्या रुपाने पाहिला बळी घेतला.
या कामगारांकडे कामावर कोणत्याही प्रकारची सुरक्षा साधने दिसून येत नाहीत. तसेच त्यांच्या प्रवासाची कोणतीही स्वतंत्र वाहतूक व्यावस्था या ठिकाणी उपलब्ध नाही. त्यामुळे अहमदनगरच्या जिल्हाधिकारी साहेबांनी आज घडलेल्या या घटनेची तात्काळ उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करावी व मयत कामगाराच्या कुटुंबाला कामगार कायद्यातील तरतुदीनुसार नुकसान भरपाई मिळावी ही विनंती. आप्पासाहेब भिमराज ढूस,
अध्यक्ष - प्रहार श्रमिक सेवा संघ.
अध्यक्ष - प्रहार जनशक्ति पक्ष, श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ यांनी केली.
0 Comments