उस्मानाबाद - उमरगा तालुक्यात शासकीय हमीभाव खरेदीकेंद्र सुरु करा व कृषी केंद्रातील मनमानी कारभाराची चौकशी करा
तालुक्यात गेल्या दोन ते तीन वर्षापासुन सततचा पाऊस व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान होत आहे. सन २०२२ चा खरीप हंगामही वाया गेला आहे.
तरीही शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने रब्बीची पेरणी केली. रब्बीची पीके बहरात आहेत, अनेक ठिकाणी हरभरा पीकाची काढणी व राशी सुरु झाले आहेत, हरभरा पीकाला शासकीय हमी भाव ५३३५/- रुपये असताना सध्या बाजारात ४४००/- ते ४५००/- रुपये इतका दर मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्याची लुट होवुन आर्थिक नुकसान होत आहे. तसेच शहर व तालुक्यातील कृषी सेवा केंद्रातुन बीयाणे औषधे व रासायनिक खताचा अवैद्य साठा दाखवण्यात येत आहे व खते, औषधे, बीयाणे यांचा कृत्रीम तुटवडा निर्माण करुन मनमानी दराने याची विक्री केली जात आहे.
या प्रकाराची सखोल चौकशी करुन संबंधितावर कार्यवाही करण्यात यावी. तसेच तालुक्यातील शेतकऱ्याची होणारी लुट थांबवुन शासकीय हमीभाव खरेदी केंद्राची सुरुवात करावी.
अन्यथा येत्या दि.१५/०२/२०२३ वार-बुधवार रोजी आपल्या कार्यालयासमोर ओव्या गात जात्यावर हरभरा भरडुन आंदोलन करण्यात येईल असा ईशारा देण्यात आला.
या वेळी बाळासाहेब माने (तालुका अध्यक्ष अ.भा. छावा संघटना), दादा बिराजदार (संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष, उमरगा), राहुल कांबळे (ग्रा. प. सदस्य, तुरोरी)
नागेश भोसले, (शेतकरी मुरुम) रामेश्वर सुर्यवंशी (तालुकाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना, उमरगा) उपस्थित होते.
0 Comments