कळंब - पिंपळगाव (डोळा) - जागतिक महिला दिनानिमित्त आम्हा शेतमजूर महिलांचा सत्कार पहिल्यांदाच कामावर होत असल्याने आम्ही भारावून गेलो असून आम्ही पण कर्तुत्वान असल्याची जाणीव निर्माण करून देणाऱ्या संस्थेचे ऋणी राहूत असे हृदयस्पर्शी उदगार आपल्या मनोगतातून शेतमजूर महिला वर्षा फकीर यांनी काढले.
जागतिक महिला दिनानिमित्त दिनांक ८ मार्च २०२३ रोजी सायंकाळी ५.०० वाजता प्रबुद्ध रंगभूमी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने अध्यक्ष सुभाष घोडके यांच्या पिंपळगाव (डोळा) येथील शेतात कळंब शहरातील समता नगर येथील वर्षा फकीर, कावेरी करवलकर, सारिका गायकवाड, संगीता निकम, विशाखा सरदार, माया धावारे, आशा चव्हाण, छाया धावारे, आशा कांबळे, कालींदा जगताप सह ज्वारी काढणी- खूडणी करणाऱ्या आकरा शेतमजूर महिलांचा संस्थेचे सचिव प्रा.अविनाश घोडके व अध्यक्ष सुभाष घोडके यांनी गुलाबपुष्प देऊन सत्कार केला.
याप्रसंगी सुभाष घोडके यांनी जागतिक महिला दिनाचे महत्त्व विषद केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्तावना प्रा.अविनाश घोडके यांनी केले तर आभार सागर घोडके यांनी मानले.
प्रतिनिधी - अमोल रणदिवे
0 Comments