कॅनव्हास इंटरनॅशनल स्मार्ट स्कूल, कळंबचा अनोखा उपक्रम
कळंब (प्रतिनिधी): धाराशिव जिल्ह्यातील कळंब येथील कॅनव्हास इंटरनॅशनल स्मार्ट स्कूलच्या माध्यमातून दिल्ली येथून कळंब शहरात प्रथमच आत्याधूनिक प्लँनेटोरियम डोम सोबत रिअल टाईम दोन टेलीस्कोपसह, वैज्ञानिकांचे मार्गदर्शन आणि महाआकाशदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमा अंतर्गत दिनांक 14 आणि 15 मार्च 2023 या दोन दिवसात कळंब तालुक्यातील दोन हजार विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी महाआकाशदर्शन अनुभवले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन धाराशिव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी केले. या कार्यक्रमात विविध शाळेतून आलेल्या विद्यार्थ्यांनसाठी सायन्स, मॅथ, स्पेस आणि रोबोटिक्स एक्स्पो चे आयोजन करण्यात आले होते.
इंटरनॅशनल अस्ट्रॉनॉमिकल युनियन (IAU) चे शास्त्रज्ञ डॉ. महादेव पंडगे यांनी अंतराळ, खगोलशास्त्र आणि या क्षेत्रातील भविष्यातील संधींबद्दल मार्गदर्शन केले.
0 Comments