कळंब - मौजे पिंपळगाव(डोळा) येथील रमाई आवास योजनेतील मंजूर घरकुलासाठी गावच्या विस्तारवाढीसाठी शासनाने दिलेली जागा त्वरित मिळावी म्हणून दिनांक २१ मार्च २०२३ रोजी लाभार्थीसह नियोजित उपोषण शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपामुळे पुढे ढकलले असून १८ एप्रिल २०२३ रोजी बेमुदत उपोषण करणार असल्याचे पत्र जिल्हा अधिकारी उस्मानाबाद यांना कळंब तहसील मार्फत दिले असल्याचे काँग्रेस नेते भागवत धस यांनी कळविले आहे.
रमाई घरकुल योजनेतून २३ लाभार्थ्यांना घरकुल मंजूर आहेत मात्र जागा नसल्याने हे लाभार्थी बांधू शकत नाहीत. पिंपळगावच्या विस्तारवाढी साठी एक हेक्टर शासनाने संपादित करून दिली असून त्याचा मावेजा सुद्धा दिला आहे
परंतु तहसील कडून ग्रामपंचायतला जागा मिळण्यास दिरंगाही होत असल्याने २३ मंजूर घरकुल लाभार्थ्यासह बेमुदत उपोषणास बसत असल्याचे आमच्या प्रतिनिधीला भागवत धस यांनी बोलून दाखवले.
प्रतिनिधी - अमोल रणदिवे
0 Comments