कळंब तालुक्यातील जि. प. प्रशाला इटकूर या शाळेतील सातवी वर्गात शिकत असलेल्या प्रीती प्रदीप गाडे या विद्यार्थिनीने अंतरिक्ष सहल गणित-विज्ञान स्पर्धा परीक्षेत केंद्र स्तर, तालुका स्तर व जिल्हा स्तर या तीनही परीक्षेत इटकूर प्रशालेचे स्थान कायम ठेवत दैदिप्यमान यश मिळवले. यातून तिची आंध्र प्रदेश येथील श्रीहरिकोटा संशोधन केंद्र येथे अभ्यास सहलीसाठी निवड झाली आहे.
जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील संशोधन प्रक्रियेची माहिती मिळावी, शास्त्रज्ञांचे कामकाज जवळून पाहता यावे, यासाठी केंद्र, तालुका व जिल्हा अशा तीन टप्प्यांवर परीक्षा घेऊन जिल्ह्यातून प्रत्येक तालक्यातील 3 अशा एकूण 24 विद्यार्थ्यांची हवाई सफर निश्चित झाली आहे.
विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यासाठी अंतरिक्ष सहल हा उपक्रम हाती घेण्यात आला. या सहलीसाठी गुणवत्तेच्या कसोटीवर उतरलेलेच विद्यार्थी जावेत यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र, तालुका व जिल्हा अशा तीन स्तरावर स्पर्धा परीक्षा घेण्यात आली.
या तीनही परीक्षांत इटकूर येथील सातवी वर्गातील प्रीती प्रदीप गाडे हिने इटकूर शाळेचे स्थान कायम राखले. तिला या परीक्षांसाठी शाळा स्तरावर अनिल क्षिरसागर व अंजली यादव यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल मुख्याध्यापक श्रीधर ठोंबरे, गटशिक्षण अधिकारी मधुकर तोडकर, विस्तार अधिकारी सुशील फुलारी, केंद्रप्रमुख पांडुरंग गामोड व शिक्षण प्रेमी ग्रामस्थ अशा सर्व स्तरावर शाळेचे कौतुक होत आहे.
प्रतिनिधी अमोल रणदिवे
0 Comments