श्रीरामपूर - दिनांक 19 मार्च 2023 रोजी औरंगाबाद छत्रपती संभाजी नगरचे नामांतर समर्थनार्थ मोर्चा काढण्यात आला .
त्यावेळी अनेक पक्ष संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते त्यावेळी निळा झेंडा व त्यावर असलेल्या अशोक चक्र असे झेंडे घेऊन देखील काही कार्यकर्ते या मोर्चा सहभागी झाले परंतु काही समाजकंटकांनी झेंडे फेकून दिल्याने झेंड्याचा अवमान झाला आहे .
या घटनेचे चित्रीकरण करून व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला त्यामुळे महाराष्ट्रातील आंबेडकरी अनुयायां मध्ये संपर्क भावना उमटले आहे व आंबेडकरी प्रेमी यांच्या भावना दुखावल्या आहेत तरी या मोर्चाच्या आयोजकाविरुद्ध कायदेशीर कारवाई होऊन गुन्हा दाखल करण्यात यावा .
या करीता भिम मगर्जना संघटनेच्या वतीने अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय व माननीय पोलीस निरीक्षक श्रीरामपूर यांना निवेदन सादर करण्यात आले .
त्यावेळी संघटनेचे अध्यक्ष फिरोजभाई पठाण, जिल्हा कार्याध्यक्ष मोहसिन शेख, तालुका अध्यक्ष रफिक शहा, तालुका युवक रफिक पठाण, अंकित पगारे, अमीन पिंजारी, रोहित पटेल, सुभम साळवे, रवींद्र धिवर, गौरव पगारे, सागर गायकवाड, अजय मगर, प्रतीक पगारे, प्रतीक चव्हाण, सतीश घोरपडे, मुनाफ पिंजारी,
गौसे आजम सेवाभावी संस्थेचे सुलतान शेख मुख्तार सय्यद आधी महिला पुरुष कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
अहमदनगर प्रतिनिधी - जालिंदर अल्हाट
0 Comments