कळंब तालुका पत्रकार संघाच्या पत्रकार भवनचे उद्घाटन व स्व. राजेंद्र मुंडदा कृषी वैभव पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
कळंब धाराशिव चे आमदार यांच्याआमदार स्थानिक विकास निधीतून हे भवन साकारण्यात आले असून याच्या उभारणीत सर्व पत्रकारांचे भरीव योगदान आहे. हे पत्रकार भवन पत्रकारांना प्रेरणा व ऊर्जा देणारे ठरेल. या ज्ञान मंदिराचे पावित्र जपत मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचा वारसा पुढे नेण्याचे काम करावे असे आवाहन केले.
यावेळी स्व. राजेंद्र मुंडदा कृषी वैभव पुरस्कार आदर्श शेतकरी लिंबराज नाना चोंदे यांना प्रदान करण्यात आला. नानांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी ए.बी.पी.वृत समूह संपादक राजीव खांडेकर, राजकीय विश्लेषक अभय देशपांडे, तालुकाप्रमुख शिवाजी आप्पा कापसे, बंडोपंत दशरथ, डॉ. प्रतापसिंह पाटील, युवासेना उपजिल्हाप्रमुख सागर बाराते, पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष चंद्रसेन देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष बालाजी निरफळ, तालुकाप्रमुख अशोक शिंदे व कळंब तालुका पत्रकार संघातील सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते.
कळंब प्रतिनिधी - अमोल रणदिवे
0 Comments