खबरे हर पल सच का सामना हम करते है लोकतंत्र से सच्ची पत्रकारिता से

W3Schools

वेद शैक्षणिक संकुलाच्या वतीने विविध कर्तृत्ववान महिलांचा सत्कार संपन्न

कळंब - जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने वेद शैक्षणिक संकुल अंतर्गत डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दि.८ मार्च २०२३ रोजी भैरवनाथ अध्यापक विद्यालय व भैरवनाथ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वर्कशॉपमध्ये कळंब परिसरातील विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा यथोचित सन्मान प्रा. मोहिनी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
याप्रसंगी सांप्रदायिक क्षेत्रातील वारकरी साहित्य परिषद उस्मानाबाद महिला जिल्हाध्यक्षा ह.भ.प.सुनितादेवी अडसूळ महाराज, अंधश्रद्धा निर्मुलन समिती शहर कार्याध्यक्ष प्राजक्ता पाटील, सेवा निवृत्त गटविकास अधिकारी त्रिवेणी पोटभरे, सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रा.संगीता कदम व सामाजिक कार्यकर्त्या विजया पांचाळ यांच्या कर्तत्वान कामगिरी बद्दल शाल व पुष्पगुच्छ देवून सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी सर्व मान्यवरांनी शिक्षणापासून प्राचीन व आधुनिक काळातील महिलांची केलेली प्रगती ही उदाहरणासाहित सांगितली.
या प्रसंगी भैरवनाथ औद्योगिक संस्थेतील वेल्डर ट्रेडमधील प्रशिक्षणार्थी अशोक कांबळे याचा वाढदिवसाच्या निमित्ताने व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी आशिष आवाड, सुप्रिया चव्हाण, गोविंद वावरे, अमर काळे, श्रीकांत धाकतोडे, तुकाराम मिरगणे यांचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी भैरवनाथ अध्यापक विद्यालयातील प्रशिक्षणार्थी शिक्षका सीमा चोरघडे,साक्षी वायसे यांनी मनोगते व्यक्त केली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला राजमाता जिजाऊ माँसाहेब,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला तर कार्यक्रमाचा शेवट हा राष्ट्रगीताने करण्यात आला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशिक्षणार्थी शिक्षिका संचिता चोरघडे यांनी तर प्रास्ताविक वैष्णवी सुरवसे व आभार साक्षी सोनवणे यांनी केले.

यावेळी भैरवनाथ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य सुरज भांडे, प्रा.श्रीकांत पवार, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.अविनाश घोडके, निदेशक सागर पालके, निदेशक विनोद जाधव, निदेशक अविनाश म्हेत्रे, विनोद कसबे सह सर्व विद्यार्थी -विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

चौकट - आई,बहीण,मावशी,पत्नी,मैत्रीण आदी महिलाशिवाय पुरुषाची कोणतीच प्रगती होत नाही. 
- प्रा.संगीता कदम

प्रतिनिधी - अमोल रणदिवे 

Post a Comment

0 Comments

पत्रकारिता के लिए सहायता करें

Follow on Dailyhunt

W3Schools

Contact Form

Name

Email *

Message *

W3Schools